ऋतुपर्णो घोष यांनी अनेक बंगाली आणि हिंदीमध्ये यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केले होते. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. स्त्रीत्वाच्या खुणा कधी साडीतून तर कधी दागिन्यांमधून अधोरेखित करणा-या घोष यांनी नव्वदीच्या दशकात चित्रपट दिग्दर्शनातील कारकीर्द सुरू केली, घोष यांच्या कारकिर्दीला जाहिरात क्षेत्रापासून सुरुवात झाली. यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळाले. ऋतुपर्णो घोष यांनी १९ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये त्यांनी तब्बल बारा राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.
ऋतुपर्णो घोष यांचा हीरेर अंगती’ म्हणजेच हिर्यायची अंगठी हा पहिला चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला. त्याच वर्षी त्यांनी केलेल्या उन्नीशे अप्रैल’ सिनेमाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. समीक्षकांनीही घोष यांच्या चित्रपटांचे भरभरून कौतुक केले आहे. त्यामुळेच ते एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून परिचीत होते. दहन’, उत्सव’, चोखेर बाली’, रेलकॉट’, दोसोर’, द लाल्ट लियर’, शोब चरित्रो कल्पोनिक’ आणि अबोहोमन’ या चित्रपटांनी पुरस्कारांवर मोहर उमटवली. सुबह सुबह का ख्याल बाजे, वापस गोकुल चले मथुरा राज’ या ओळी आठवल्या की उदात्त-उत्कट आर्त भावनांची अस्वस्थता मनात उतरवणारा दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचा ‘रेनकोट’ हा चित्रपट आठवल्यावाचून राहत नाही. बॉलिवूडमध्ये ऋतुपर्णो यांनी अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत रेनकोर्ट हा सिनेमा केला होता.
‘पिया तोरा कैसा अभिमान, मथुरानगरपती’ यांसारखी या चित्रपटातली वेगळ्या धाटणीची गाणी, अखंड बरसणारा पाऊस आणि चित्रपटातील ऐश्वर्या-अजयचे चौकटीपलीकडचे नाते यामुळे हा चित्रपटही सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार घेऊन गेला.दु:खाची तसेच प्रेमाची भव्यता, अस्मितेचा, अस्तित्वाचा चौकटीबाहेरचा अभिमान, वरकरणी समाजव्यवस्थेला आव्हान देणा-या पण मानसिक आंदोलने झेलत समाजाच्याच परिभाषेला समांतर चालणा-या व्यक्तिरेखा आणि या व्यक्तिरेखांवर पकड असलेली व्यवस्था असा घोष यांच्या चित्रपटांचा परीघ कायमच चर्चेचा विषय राहिला. त्यांचे माध्यमांना अनुकूल असणे, प्रसिद्धीच्या बाबतीत बंगाली शैलीपेक्षा बॉलीवूडकडे झुकलेली शैली पत्करणे, आपल्या स्त्रीत्व व्यक्त करणा-या (फेमिनाइन) राहणीमानाचा खुलेपणाने स्वीकार करणे, यामुळे घोष यांच्या चित्रपटांभोवतीचे वलय कायम राहिले.
अमिताभ बच्चन, प्रीटी झिंटा, अर्जुन रामपाल यांना घेऊन घोष यांनी २००७ मध्ये आलेला ‘द लास्ट लिअर’ हा इंग्रजी चित्रपट समीक्षकांच्या चर्चेचा विषय राहिला. शेक्सपिअरन थिएटरने भारावलेल्या माणसाची ही कथा होती. घोष यांचा हा चित्रपट तथाकथित बंगाली चौकटीच्या पलीकडचा ठरला. यानंतर रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर बेतलेल्या ‘नौका डुबी’ या घोष यांच्या चित्रपटाने ‘मिलन’ आणि ‘घूंघट’ या हिंदी चित्रपटाच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात ताज्या असताना आपला स्वतंत्र ठसा उमटवला.
चित्रपटांचे मूळ रेंसारख्या दिग्दर्शकांच्या चित्रपटविषयक विचारसरणीत आढळत असेल तरीही वास्तवापेक्षा वास्तवाला कारणीभूत ठरणारी पार्श्वभूमी गडद करण्याकडे घोष यांचा कल होता, असेही त्यांच्या चित्रपटांवरून अनेकदा जाणवत आले आहे. घोष यांनी शोकात्म अभिव्यक्तीचा प्रवाह अतिरंजिततेकडून अतिउदात्ततेकडे नेला. प्रणयाचीही भाषा वेगळ्या त-हेने मांडली. त्यांच्या चित्रपटांमधली स्त्री व्यक्तिरेखा नेहमीच आधुनिक विचारसरणीची, बंडखोरीची वा एक्स्ट्रिमिटीची भाषा करणारी, असली तरीही त्यांचा एकूणच चित्रपट हा भांडवलशाहीचा पुरस्कार करणा-या मटेरिअॅणलिझमचे समर्थन करणारा आहे, हेदेखील लपून राहत नाही. त्यांचा शेवटचा ‘चित्रांगदा’ हा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरलेला पण राष्ट्री य पुरस्कारप्राप्त चित्रपटही याच प्रकारात मोडणारा होता. अबोहोनम’ या बंगाली चित्रपटासाठी त्यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
ऋतुपर्णो घोष यांचे ३० मे २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply