नवीन लेखन...

दिग्दर्शक यशवंत पेठकर

यशवंत पेठकर यांचा जन्म १५ मे १९०९ रोजी कोल्हापूर येथे झाला.

यशवंत पेठकर यांचे वडील हे एका शिक्षण संस्थेत शिक्षक होते. त्यांच्या हाताखालीच मास्टर विनायक यांनी शिक्षण घेतले होता. पेठकरही पुढे त्या शिक्षणसंस्थेत काही काळ शिक्षकाची नोकरी करत होते.

मास्टर विनायकांनी १९३७ सालात ‘प्रेमवीर’या विनोदी चित्रपटाची निर्मिती केली. त्या चित्रपटात यशवंत पेठकरांनी विनोदी खलनायकाची भूमिका उत्तम केली. पडद्यावर ओझरते दर्शन देऊन पेठकर पुढे दहा वर्षांनी चित्रपटसृष्टीत आले. १९४७ मध्ये साने गुरुजींच्या ‘रामाचा शेला’ या कादंबरीवरून प्रभात फिल्म कंपनीने ‘आगे बढो’ या चित्रपटाची निर्मिती केली. पेठकरांनी त्याचे दिग्दर्शन केले आणि तेथून पेठकरांची चित्रपटसृष्टीतील आगेकूच सुरू झाली. देव आनंद चित्रपटाचा नायक होते आणि त्या काळातील गाजलेल्या अभिनेत्री खुर्शिद या चित्रपटाच्या नायिका होत्या.

प्रभातने पेठकरांना ‘अपराधी’ हा पुढला चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळाला. १९४२ च्या चले जाव चळवळीवर याची चित्रकथा बांधली होती. त्यात नायक-नायिकेच्या भूमिकेत होते रामसिंग व मधुबाला आणि अच्युतराव पटवर्धनांच्या व्यक्तिरेखेशी साम्य असणारी भूमिका केली होती प्राण या नटाने. या चित्रपटात प्राण हे खलनायक नव्हते, तर एक क्रांतिकारक होते. पेठकरांच्या कामाच्या पद्धतीवर खूश होऊन मुंबईच्या प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट्ट यांनी पेठकरांना मोठा मोबदला देऊन मुंबईला आणले व ‘शादी की रात’ हा हिंदी चित्रपट त्यांच्या हातात दिला. त्यात गीता बाली, रेहमान, अरुण यांसारखे आघाडीचे कलाकार होते. सुधीर फडके यांनी त्यांना ‘रत्नधर’ हा आपला चित्रपट दिला. चित्रपट उत्कृष्ट जमला होता, पण भागीदारांच्या भांडणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘अपराधी’चा नायक असणाऱ्या राम सिंग यांनी पेठकरांना ‘सौ का नोट’ हा आपला चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. त्यात गीता बाली, करण दिवाण, बेगमपारा हे कलाकार होते.

प्रभादेवीच्या किस्मत टॉकिजचे मालक बेहराम यांना एक मराठी चित्रपट काढायचा होता. त्यांनी कथा लिहिली होती. ‘झालं गेलं विसरून जा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची, पटकथालेखनाची आणि संवाद लिहिण्याची कामगिरी बेहराम यांनी पेठकरांवर सोपवली. हा चित्रपट गाजला. उषाकिरण यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी ‘चोरावर मोर’ या आपल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरली होती. पेठकरांनी यशवंत देव यांना या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी दिली. पेठकरांनी गजानन शिर्के यांना ‘मोलकरीण’सारखा उत्तम चित्रपट काढून दिला. हाच चित्रपट पुढे त्यांनी गुजराती भाषेत ‘मोटी वा’ या नावाने काढला. त्या गुजराती चित्रपटाला गुजरात सरकारने सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट म्हणून गौरवले. पेठकरांनी पुढे ‘कधी करशी लग्न माझे’, ‘तूच माझी वहिनी’, ‘मायमाउली’, ‘सून लाडकी या घरची’ यासारखे यशस्वी चित्रपट काढले आणि चित्रपट जगतातून निवृत्ती घेतली. पुढे एका तपानंतर १९९१ साली त्यांनी निर्माते शरद वैद्य यांच्या आग्रहास्तव ‘संत नामदेव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

यशवंत पेठकरांनी आपले आत्मचरित्र लिहावयास घेतले होते, पण ते पूर्ण होण्याअगोदर मृत्यूने त्यांना गाठले. चिरंजीव अविनाश पेठकर यांनी यशवंत पेठकर यांना ‘कीचकवध’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी साहाय्य केले होते. सुमित कांत कौल म्हणजे यशवंत पेठकर यांचा नातू होय. ‘पाखी’ या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा सुमित देखील आजोबांकडून मिळालेला वारसा जपत त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत मराठी चित्रपटसृष्टीत येण्यास इच्छुक आहे.

यशवंत पेठकर यांचे २८ एप्रिल १९९५ रोजी निधन झाले.

— द. भा. सामंत.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..