तू सदा फिरस्ता .
मी एकाच जागी एकाच चक्रात अडकलेली .
पण कुठेही असलास तरी सकाळी मेसेज आणि दिवसभरात एक तरी फोन न चुकता करणारा तू .
मी नवीन काहीही लिहिले तरी सगळ्यात पहिल्यांदा तुलाच वाचून दाखवणे .
आधी whatsapp आणि मग दिवसभरातला voice call .
कारण तुला skype download करायचा कंटाळा .
” जमलय ” अशी तुझी दिलखुलास दाद . . .
आणि मग तू प्रत्यक्षात म्हणायच्या आधीच माझ्या काना – मनात घुमनार तुझे वाक्य . . . जवळ असतीस तर . . . ”
हे वाक्य नाही रे पाठ सोडत . . .
. . . . . . . . .
थांब . माझे हे समरसलेपण तेंव्हा दुबळपण ठरवले गेले .
” प्लीज़ . . . ”
” आज तू हळवी झाली आहेस म्हणून शिळी सावली ओढू नकोस . कवितेचे निमित्त नको . उत्सुक बाहुन्चा माझा मांडव आजही सजलेलाच आहे . ”
” मला त्याबाबत शंका नाही . ”
” कॉलरच टोक अजूनही ओल आहे . आणि बटणपट्टीत महिरप . ”
” महिरप काय ? ”
” त्याला गुंतवळ म्हणण्या इतका अरसिक मी तेन्व्हाही नव्हतो ; आणि आजही नाही . ”
” खरं आहे रे . नकळत आता मी . . . . ”
” कशानी नर्वस झाली आहेस आज ? ”
” खूप आठवण येते आहे . . . मी असं वाचून दाखवले की तू म्हणायचास . . . . जितके चांगले लिहितेस , तितके चांगले वाचूनही दाखव ना ! ! ! ”
” कारण त्याशिवाय ती मजा येत नाही ना ”
” हो . पण मला नाही ना जमत ते . मग प्रत्यक्ष भेट झाली की तूंच ते छान म्हणून दाखवायचास . . ”
” त्यावर तुझे ठरलेले वाक्य . . . तू ना अभिवाचन करायला छान माणूस आहेस . ”
” आणि तुझे ठरलेले उत्तर . . . मी कोणीही लिहिलेले असॆ वाचत नाही आणि सगळ्यांसाठी तर नाहीच नाही ”
” हं ”
” आणि या उत्तराने माझे तुला बिलगण . . तुला आवडलेल्या वाक्यान्ची उजळणी . . . त्यावेळी घट्ट होत गेलेली तुझी मिठी आणि तुझ्या छातीवर माझेविसावलेले डोक आणि त्यावर टेकवलेली तुझी हनुवटी . . . आता ते सारे निव्वळ भास . ”
” भासाना अंत असतो . आणि तो आपल्या हातात असतो . ”
” नाही रे . . . हे सगळ्याच बाबतीत खरे नसत रे ” .
” मग ते भास संजीवक असतात हे मानण्यावाचून गत्यन्तर नसते . कारण प्रत्येकच तिन्हिसान्ज कातरवेळ नसते . त्यावेळेला गोरजमुहुर्त असाही शब्द आहे ग . ”
” त्यालाच दिवेलागण म्हणतात हे म्हण ना रे . . . . तुझे हे वाक्यच माझा आधार , दिलासा आहे . ”
” दिवेलागण नेहमी आधी मनात होत असते ग . . . पदर तर पेटला नाही पाहीजे आणि दिवा तर विझला नाही पाहीजे . ”
” आज तेच मन . . . ”
” strol नीट कर . . कॉलर च टोक अजूनही ओल आहे . ”
” दिवेलागण सजते आहे . शोल्दर – कट ची तुझी लाडकी बट तुला साद घालते आहे . ”
” काजळी झटक असं सांगते ग दिवेलागण ”
— चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोंबिवली ( पूर्व ) .
पिन . . . ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
इमेल . . . tilakc@nsdl.co.in
Leave a Reply