नवीन लेखन...

घटस्फोट आणि भारतीय संस्कार…

Divorce and Indian Values

आपल्या देशात हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलयं हा कित्येकांसाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू लागलेला आहे.

आपल्या देशातील हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण दिवसेन- दिवस वाढतच जाणार आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल या भ्रमात कोणीच राहाता कामा नये आणि ते प्रमाण कमी व्हाव म्ह्णून प्रयत्न करणे म्ह्णजे उंठावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणामुळे भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांना सामोर जाण्यासाठी समाजाची मानसिकता तयार व्हायला हवी.

प्रेमविवाहाचं वाढत प्रमाण आणि घटस्फोटाचं वाढत प्रमाण याचा परस्पराशी काहीही संबंध नाही तो संबंध विनाकारणच लावला जातो. स्त्री-परुष समानतेच वारं, स्त्रियांची झालेली सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती, पुरुषांची ढासळती नैतिकता, समाजातील वाढता स्वैराचार आणि होत चाललेला सांस्कृतिक र्‍हास या वाढत्या घटस्फोटाच्या मुळाशी आहे. आज आपल्या देशात घटस्फोट रोखण्यासाठी जो काही आटा – पिटा केला जातोय तो निरर्थकच म्हणावा लागेल.

आज आपल्या देशात समलैंगिक विवाहांना, लिव्ह-ईनला जवळ – जवळ स्वीकारलं आहे ना मग तसचं आज ना उद्या घटस्फोटांनाही स्वीकारावं लागणारचं आहे. पूर्वीच्या काळी फक्त शरीर सुखासाठी लग्न होत नसतं पण आता ती फक्त शरीर सुखासाठीच होतात हे मान्यच करावं लागेल कारण आज आपल्या देशात होणार्‍या घटस्फोटासाठी जोडीदार शरीरसुख देण्यास असमर्थ अथवा त्याचे असणारे विवाह बाहय संबंध अथवा त्याची व्यसनाधिनता अशी कारणेच पुढे केली जातात. ही सर्व कारणे पूर्वी अस्तित्वात नव्हती का ? होती ना ? पण त्यावेळी सामाजिक दबावामुळे सहसा कोणी घटस्फोट घेण्याच्या भानगडीत पडत नसे आणि तेंव्हा पत्नी – पतीकडून घटस्फोट मागण्याचे प्रमाण कमी होते. आज जर नवर्‍याने बायकोला घटस्फोट दिला तर तिला अबला म्हटले जाते. आणि बायकोने नवर्‍याला घटस्फोट दिला तर त्याला नामर्द समजले जाते.

आज आपल्या देशात घटस्फोटाचं प्रमाण वाढतय त्याला स्त्री- पुरूष दोघेही सारखेच जबाबदार आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे. वाढत्या घटस्फोटाला फक्त पुरूषांनाच दोष नाही देता येणार. स्त्रियांच्या व्यसनाधिनतेच आणि ढासळत्या नैतिकतेच प्रमाण समाजात मोठ्या प्रमाण वाढू लागलेल आहे सध्या समाजात घडणार्‍या गुन्हयात स्त्रियांचा सहभाग दखल घेण्याजोगा दिसू लागला आहे. घटस्फोट हे प्रकरण हल्ली कित्येकांच्या जीवावरही बेतू लागलेलं आहे.

विवाहसंस्था ज्या उद्देशाने अस्थित्वात आलेली होती आता तो उद्देशच नाहिसा झालेला आहे. समर्पण, त्याग, विश्वास, नात्याशी बांधिलकी हया गोष्टी लग्न संस्थेतून हद्दपार झालेल्या आहेत. आज काही लग्न बरीच वर्षे टिकतात तेंव्हा लोकांना आश्चर्य वाटत पण ती लग्न खरोखरचं टिकलेली असतात की टिकवलेली असतात हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करतो का ? पुर्वी जेंव्हा संस्कार शाबूत होते तेंव्हा नवरा- बायको दोघेही शेवटच्या श्वासापर्यत लग्न टिकविण्याचा प्रयत्न करत असत. नवरा – बायकोसारखे संबंध नसताना फक्त जगासाठी नवरा-बायको म्ह्णून एका छताखाली राहात असत फक्त आपल्या मुलांसाठी ! पण आता स्त्रियांची मुलांबाबतची ती बांधीलकी ही ढासळू लागली आहे.

पाश्चात्यांच वाढत अंधानुकरण या बाबतीत आपल्या गळ्याशी येणार आहे कारण पाश्चात्यांची घटस्फोट पचविण्याची मानसिकता कधीच तयार झालेली आहे पण आपल्याकडे ती मानसिकता तयार करण्याऐवजी आपण उगाच घटस्फोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी झटतो आहोत.

नवरा बायको या दोघांपैकी एकाला जेंव्हा घटस्फोट हवा असतो तेंव्हा तो एकानं नाकारण म्ह्णजे मुर्खपणा आहे कारण त्यातून मनस्ताप आणि आयुष्यभराची फरफड याशिवाय काहीही साध्य होत नाही. पूर्वी पुरूषांना एकापेक्षा जास्त विवाह करण्यास समाज मान्यता होती त्यामुळे पूर्वी घटस्फोटाच प्रमाण कमी होत असं नाही म्ह्णता येणार कारण आपल्या संस्कृतीने घटस्फोट कधी मान्यच केलेला नव्हता. आता फक्त घटस्फोट घेऊन प्रश्न सुटत नाही कारण त्यानंतर घटस्फोट घेणारे वेगवेगळ्या जोडीदारांसोबत पुन्हा विवाह करतात त्यातून जन्माला येणारी मुलं आणि पूर्वीच्या विवाहातून जन्माला आलेली मुलं यामुळे अत्यंत गंतागुंतीचे नातेसंबंध निर्माण होतात त्यामुळे पुढची पिढी गुन्हेगारी प्रवृत्तीची म्ह्णून पुढे येण्यास हातभार लागतो.

आता आपल्या देशातील वाढत्या घटस्फोटाचं प्रमाण रोखण्यापेक्षा आपली भारतीय संस्कृती आणि संस्कार जपण्यासाठी प्रयत्न होण्याची अधिक आवश्यकता आहे नाही का ?

लेखक – निलेश बामणे.
मो. 8652065375 / 8692923310

Avatar
About निलेश बामणे 418 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..