पंख फुटता उडूनी गेला, सात समुद्रा पलीकडे
आकाशातील तारका होत्या, लक्ष्य तयाच्या नजरेपुढे
निसर्गाने साथ देवूनी, दणकट दिले पंख तयाला
झेप घेत जा दाही दिशांनी, मनी ठसविले त्या पक्षाला
आत्मविश्वास तो जागृत होता, चिंता नव्हती स्थळ काळाची
कुठेही जाईन झेपावत तो, ओढ तयाला दिव्यत्वाची
निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या
देईन अंगच्या छटा निराळ्या, चमक दाखवित ह्या जगताला
स्वच्छंदाची नशा मनस्वी, विसरूनी गेला सर्व जगाला
कुठे तो होता कोठूनी आला, आठवण येई मध्येच त्याला
सोडूनी दिले सारे ते त्याचे, आजभोवती विश्व निराळे
नाविन्याचा शोध शोधता, जुने विसरणे आता आले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply