दिवाईना दिन,
धाबे धाबे दिवा,
भाऊ कसा म्हणे,
मना बहिनना येवा
दिवाईनं मुई
नका फिरावा आत्याबाई
नवस्या बंधू म्हना
घर किलावन्या जाई
दिवाईना दिन,
मनी थाटमा नथ,
अशी ओवाई ऊन,
भाऊ तुन्ह धन भर गोत
दिवाई दसरा
खेती बाडी ना पसारा
बंधू कसा म्हणे
बहिनी दिवाई इसरा
दिवाईना दिन
मना थाटमाना येल्या
अशी ओवाई ऊनी
आयबा तुना बोरस्याना गल्या
दिवाईना मुई
वाट लाई दे सासुबाई
भाऊ मना फिराले फिरी जाई
माय मनी यमुना वाट पाहि
दिवाईना मुई
वाट लाई दया सासरा
मना भाऊले ओवायाले
सन नही रे दुसरा
सासु आत्याबाई
पाया पडू दया बागात
दिवाईना मुई
भाऊ मना चालना रागात
दिवाईना दिन
म्हनं ताट जड जड
बंधूनी टाका व्हई
गोट पाटलीना जोड
दिवाईना दिन
मना दंडवर येल्या
अशी ओवाई ऊनी
आयबा तुना बोरस्याना गल्या
येरे येरे जेठा बंधु
वाट तुन्ही रे देखस
सयबहीननी खुशाली
दखी कायीज खुलसं…..।
ये रेेये रे बंधु
सकाय दिवाईना सण
मायबापना भेटीले
खतावन मन्हं मन…..
मायना हातनी सांजोरी
कशी व्हटेवरी खावो
सण पाव्हणले दादा
माहेरम्हानज राहो….
सासु आत्याबाई
उना मुऱ्हाई दारशे
काय रांधु मी भाऊले
माहेराले जीव तरशे
बाप मुऱ्हई येईन
गाडी खिल्लारी जोडीची
सण उना तोंडवर
दिसे वाट माहेरची…
मायनी ममतेना शेला
ऊब माहेराले भेटे
याद माहेरनी येता
आत हुंदुक रे दाटे….
…बहिणाबाई चौधरी यांची एक सुंदर रचना
Leave a Reply