आपल्या पेशीतीलं सर्व जैविक, जैवरसायनिक आणि रासायनिक प्रक्रियांचे नियंत्रण करणारा रेणू म्हणजे ‘डीएनए’ पेशीत असणाऱ्या केंद्रकात हा महारेणू सामावलेला असतो. खरे तर डीएनए एकच रेणू नसून अनेक रेणू एककांची एक भलीमोठी साखळी असते. आणि यातील प्रत्येक एकक (म्हणजे प्रत्येक मणी) चार वेगवेगळ्या रेणूंचा बनलेला असतो. जशी एखादी मण्यांची माळ असावी तशी व ही साखळी गुंडाळून केंद्रकात सामावलेली असते. डीएनएचा रेणू दुपदरी असून त्याचे दोन पदर एकमेकांभोवती एका गोफाप्रमाणे गुंफलेले असतात. त्याचा प्रत्येक पदर डीऑक्सिरायबोज हा साखरेचा रेणू व फॉस्फेट ग्रुप यांचा असतो. हे दोन पदर एकमेकांशी नत्रयुक्त घटकांनी जोडलेले असतात. एखादा गोल फिरत जाणारा जिना असतो ना त्याप्रमाणे या रेणूची रचना असते.
जिन्याचे दोन्ही कठडे डीऑक्सिरायबोज व फॉस्फेटचे आणि पायऱ्या नत्रयुक्त घटकांच्या. डीऑक्सिरायबोज ही साखर ५ कार्बन अणू, हायड्रोजन आणि ऑक्सिजनची बनलेली असते. यातील ५ कार्बन अणू एकमेकांशी बंध जोडून एक वलय तयार करतात. (ग्लुकोज ही साखर ६ कार्बन अणूंची तर चहातली साखर म्हणजे सुक्रोज ही १२ कार्बन अणूंची बनलेली असते). तिच्या पाचव्या कार्बन अणूला फॉस्फेट ग्रुप जोडला जातो. जेव्हा डीएनएची साखळी बनते तेव्हा फॉस्फेट ग्रुप एका डीऑक्सिरायबोजचा पाचवा कार्बन अणू आणि दुसऱ्या डीऑक्सिरायबोजचा तिसरा कार्बन अणू यांच्याशी बंध तयार करून साखळीच्या क्या बनवतो.
डीऑक्सिरायबोजा M दुसऱ्या कार्बन अणूला नत्रयुक्त घटक जोडलेले असतात. हे नत्रयुक्त घटक ४ प्रकारचे असतात. त्यातील अॅडेनीन आणि ग्वानीन हे प्युरीन या वर्गातील असतात. डीऑक्सिरायबोजचे जसे एक वलय असते तशी या ॲडेनीन आणि ग्वानीनची रचना २ वलयांची असते. दुसरे दोन नत्रयुक्त घटक म्हणजे थायमिन आणि सायटोसिन हे पिरिमिडीन या वर्गात मोडतात.
पिरिमिडीन एक वलयाचा बनलेला असतो. जेव्हा दोन नत्रयुक्त घटक एकमेकांशी बंध तयार करतात तेव्हा तो बंध एक प्युरीन आणि एक पिरिमिडीन यांच्यामध्ये बनतो. त्यामुळे डीएनएच्या दोन्ही कठड्यातील अंतर सारखे राखले जाते.
-डॉ. मृणाल पेडणेकर,
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply