अवतीभोवती सारे तुझ्या,
आहेत गुरू बसलेले,
जाण तयांची येण्यासाठी,
प्रभूसी मी विनविले ।।१।।
निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,
काही तरी असे गुण,
आपणासची ज्ञान असावे,
घेण्यास ते समजून ।।२।।
उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,
बघाल जेंव्हां शेजारी,
काही ना काही ज्ञान मिळते,
वस्तूच्या त्या गुणापरी ।।३।।
सारे सजीव निर्जीव वस्तू,
गुरू सारखे वाटावे,
तेच आहेत ईश्वरमय,
तुम्हीच ते समजावे ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply