जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची,
कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची…..१,
प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो,
अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो…..२,
एक किरण तो पूरे जहाला, अंधकार तो नष्ट करण्या,
ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फूलून येते ज्ञान वाहण्या…..३
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply