नाट्य निर्माता संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव यांचा जन्म ११ जून १९६० रोजी झाला.
संपादक, पत्रकार, वक्ता, नाटककार, अभिनेता, गायक, नाट्यनिर्माता, पुस्तक प्रकाशक अशी ओळख असलेले ज्ञानेश महाराव हे १९८५ सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते १९८५ ते १९८९ सालापर्यंत ‘विवेक’ या मराठी साप्ताहिकाचे सहाय्यक-संपादक म्हणून काम बघत होते. जून १९८९ पासून ते मराठी साप्ताहिक “चित्रलेखा” चे संपादक म्हणून काम बघत आहेत.
त्यांनी २० पेक्षा अधिक मराठी पुस्तके लिहिली आहेत.
परखड लेखक, वक्ते – व्याख्याते अशीही त्यांची ओळख आहे. त्यांनी विविध विषयांवर सडेतोड लेखन केले आहे.
लातूर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०११ या काळात झालेल्या ४ थ्या राज्यस्तरीय समतावादी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष राहिले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply