दोघे एका डहाळीवरच झुलू,निसर्गाचे ,देणे किती पाहू,
बघ, रसरशीत खाली फळे,
दोघे मिळून चवीने खाऊ,–!!!
पक्ष्यांची जात आपुली,
निसर्गमेवा”आपुल्याचसाठी,
मानव त्याचा बाजार मांडे,
निसर्गराजा, फिरवी कांडी,
एका वृक्षा,– किती फळे,
रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
फळ बने आणखी रुचिर,
प्रेमसंगत वाढून आपुली,
एकमेकांचे उष्टे’ खाऊ,–!!
त्यागातच प्रेम असते,
सखे, दुनियेस दाखवून देऊ,–!!
दोन “सांसारिक” जीव आपुले,
करती मधुर रसपाना,–!!!
निसर्गच लुटून देतो सारे,
शिकवतोही साऱ्या जगतां,–!!!
संसार या कैरीसारखा,–
कच्चा असता चटकदार,
चाखण्यां मिळती सर्व चवी,
आंबट, तुरट, गोडसर फार,–!!
नवीन संसार सुरु होतां,
फळां, जपावे लागते,
करतां-करतां,फळ मग,
कशी संपन्नता आणते,–!!!
हिरवाकंच रंग संपे,
जो असतो तारुण्याचा,
पिवळसर कांतिमान रंग चढे,
पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,–!!!
आंबट, तुरट फळ,
हळूहळू, होई जसे गोड,
तसेच साथीदार होती कृतार्थ,
संसारी मिळतां योग्य जोड,–!!!
फळ संपे दुसऱ्यासाठी,
बघ त्याचे समर्पण,
सूचित होई त्यातून प्रिये,
संसाराचेच उदाहरण,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply