डोळियांमध्ये किती *तरंग*,
सुख-दु:खांची प्रतिबिंबे,
समाधान,तृप्ती,हर्ष,खेद,
आनंद,लोभ,लालस *उधाणे*,–!!
आत्मिक भावनांचे किती रंग,
प्रेम, भूतदया,शांती,अशी रुपे,
बोलकी उदाहरणे कित्येक,–! कधी मात्र असती *नि:स्संग*,–!!!
डोळे रडती, डोळे हसती, डोळ्यातूनच उमटे राग,
अस्वस्थता जिवाची *काहिली*, *घालमेल* कधी असते उगीच,–!!
कधी कामवासना उफाळे,
डोळे बोलती, माणसे राक्षस, बरसात करती *संजीवने*,
कधी सुखाची ओसंडत *रांस*,–!!!
डोळ्यांचे असते *विश्व* निराळे,
त्यात माणसांची *लकब* दिसे,
सत्ता, लालसा, पैसा, दर्शवती,
हक्क कर्तव्य अधिकार *सोहाळे*,-
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply