नवीन लेखन...

डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या पाहणारा गीतकार -गुलशन बावरा

 

अखंड हिंदुस्तानात पंजाब प्रांतात लाहोर शहराजवळ शेखपुरा भागात रुपलाल मेहता यांचा बांधकामाचा व्यवसाय होता. सगळं व्यवस्थित सुखात चालले  होते.  गुलशन आपल्या भावंडाबरोबर  मजा मस्ती करत असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून तो कविताही करत असे. आणि त्याचवेळी त्यांच्या घरावर संकट कोसळले. १९४७ साल उजाडले. पंजाब प्रांतात दंगे भडकू लागले. गुलशनच्या डोळ्यासमोर आई वडिलांची हत्या झाली. दुख; करण्याचाही वेळ मिळाला नाही. अंधाराचा फायदा घेत दोघे भाऊ कसेबसे हवेलीतून निसटले. गुलशन तेव्हा फक्त १० वर्षाचा होता. एकच आसरा होता तो जयपूरच्या मोठ्या बहिणीचा. जयपूरला शिक्षण झाले. दिल्लीला कॉलेज केले. १९५५ मध्ये मुंबईला रेल्वेत नोकरी लागली. त्यात मन रमेना म्हणून १९६७ला नोकरी सोडली. कारण त्यांना गीतकार बनायचे होते. त्यांना पहिला चान्स  कल्याणजी वीरजी शाहने (त्या वेळी कल्याणजी एकटे संगीत देत होते) चंद्रसेना चित्रपटासाठी १९५९मध्ये दिला. त्याच वर्षी कल्याणजी आनंदजीने चित्रपट सट्टाबाजार साठी  चान्स दिला. त्यातील एक गाणे खूप हिट झाले “तुम्हे याद होगा कभी हम मिले थे” चित्रपटाचे वितरक शांतीभाई पटेल गाणे ऐकून खुश झाले. त्यांनी त्याचे नामकरण गुलशन मेहता वरून गुलशन बावरा केले. गुलशन बावराने कामाशी कधी तडजोड केली नाही म्हणून ते गीताचे ठणकावून पैसे मागत असत .त्यावेळी ते  सगळ्यात जास्त पैसे मागणारा गीतकार होते .ज्यावेळी मुंबईत ६५ हजारात मोठा flat मिळत होता तेव्हा ते एका चित्रपटाचे ९० हजार घेत. त्यांना २ फिल्म फेअर अवार्ड मिळाले एक उपकारच्या “मेरे देश कि धरती “ व जंजीरच्या “ यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी “ साठी. गुलशन बावरा यांनी कायम हसती खेळती गाणी लिहिली. पण बालपणाच्या प्रसंगाची व्यथा त्यांना कुठे तरी सलत होती म्हणूनच त्यांनी जंजीर मधले “ बनाके क्यू बिगाडा , बिगाडा रे नासिबा उपरवाले “ हे गाणे लिहिले. त्यांनी अनेक संगीतकाराबरोबर काम केले. पण त्यांचे जास्त  सूर जुळले ते कल्याणजी आनंदजी व आर.डी बर्मन यांच्या बरोबर. त्यांनी जवळ जवळ २४० गाणी लिहिली. त्यांनी हौस म्हणून जवळ जवळ १५ चित्रपटात काम केले.(जंजीर चित्रपटाच्या “दिवाने है दिवानोको न घर चाहिये “ या गाण्यात रस्त्यावर पेटी वाजवताना दिसतात.) ७ ऑगस्ट २००९ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांची गाजलेली गाणी

१ चांदी कि दिवार ना तोडी

२ मेरे देश कि धरती

३ यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी

४ सनम तेरी कसम

५ तुम्हे याद होगा

६ कस्मे वादे

७ अगर तुम न होते.

८ ये वादा रहा

९ वादा कर ले साजना

१० प्यार हमे किस मोड पे ले आया

११ एक मै और एक तू

१२ बच के रेहना रे बाबा

१३ चांद  को क्या मालूम

— रवींद्र शरद वाळिंबे.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..