डोळ्यांत अश्रू जमला
तरी तो धुळीने तरळला,
अस हसत सांगते
ती स्त्री च असते..
वेदना विसरुन साऱ्या
संसारात साखरेसारखी
अलगद अशी विरघळते
ती स्त्री च असते..
स्वतःकडे नंतर पण
नवरा मुलांचं सार
आधी आवर्जून बघते
ती स्त्री च असते..
स्वतःच्या भावना मन
वेळप्रसंगी न पाहता,
संसारात इतरांना जपते
ती स्त्री च असते..
आवडी निवडी माहेर
सवयी सगळं सोडून
सासरचं पहिले पाहते
ती स्त्री च असते..
सगळे घाव सोसुन
तडजोड करुन वेळप्रसंगी
मनाला मुरड घालून मन मारते
ती स्त्री च असते..
जी हसतमुखाने संसार फुलवते
आला गेला पाहुणा
सार आनंदाने पाहते
ती स्त्री च असते..
पण स्त्री चं मन,भावना,
फुलल्या जरा तर ती,
चुकली हे पाहणारी
पण स्त्री च असते..
पुरुष स्त्री ला समजून घेतो पण
स्त्री च स्त्रीची व्यथा न जाणते,
रागवू नका सखींनो पण दुनियेत
हीच करुण कहाणी कायम खरी असते..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply