मंजू सिंग यांचा जन्म १ जानेवारी १९४८ रोजी झाला.
मंजू सिंग ही एक प्रसिद्ध दूरदर्शन मालिका निर्मात्या होत्या ज्यांनी दूरदर्शनवर आपल्या मालिका दाखवून दूरदर्शनचा चेहरामोहरा बदलून टाकला. तसेच त्यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्या १९७९ साली आलेल्या ‘गोलमाल’ या चित्रपटात्यांनी अमोल पालेकर यांच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. पुढे या अभिनेत्री-निर्मात्याने नंतर अनेक टीव्ही मालिका तयार केल्या ज्यांनी तिला लोकप्रिय टीव्ही सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.
दूरदर्शनवर साहित्यिक लघुकथांवर आधारित मालिका निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला निर्मात्या होत्या. मंजू यांनी दूरदर्शनमधील कथाकथनाच्या संकल्पनेवर टीव्ही मालिका ‘एक कहानी’ (१८८३-८९) बनवली या साठी भारतातील सर्व प्रदेशांमधून सर्वोत्तम कथा त्यांनी निवडल्या होत्या,त्या काळी समीक्षकांनी या टीव्ही मालिकेची प्रशंसा केली होती. या सोबतच त्यांनी और एक कहानी,खेल खिलौने, स्वराज, जानम समजा करो या मालिका बनवल्या. ‘एक कहानी’या मालिकेबद्दल, त्यांना टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेक पुरस्कार मिळाले होते. पुढे त्यांनी मुलांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे आणि २००७ मध्ये ‘वर्ल्डकिड्स फाउंडेशन’ सुरू केले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply