नवीन लेखन...

डॉ. बाळ दत्तात्रय टिळक

डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ -१९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग सायन्समधून ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.फिल. ही पदवी दिली.

इंग्लंडमधून परत येऊन ते १९४६ साली मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. ते तेथे १९६६ सालापर्यंत होते. १९६६ साली त्यांना पुण्याला नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक म्हणून बोलावण्यात आले. ते तेथे १९७८पर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या साठीपर्यंत होते.

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये स्टिरॉइडवर्गीय रंगांच्या रसायनशास्त्रामध्ये त्यांनी मोलाची भर घातली. हेटेरोसायक्लिकस (विषमचक्रिय) संयुंगाचे महत्त्व औद्योगिक रसायनशास्त्रात वाढत आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारच्या संयुगांची जडणघडण प्रयोगशाळांमध्ये करून पाहिली. त्यांचे मूलभूत गुणधर्म तपासले आणि सखोल संशोधनही केले. या संशोधनावर आधारित ‘न्यू ट्रेंड्स इन हेटेरोसायक्लिक केमिस्ट्री’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक त्यांनी लिहिले. सल्फरशी (गंधक) संबंधित असलेल्या एका रासायनिक प्रक्रियेला टिळक प्रक्रिया (Tilak Reaction) असे नाव आहे. कृषी उद्योगांमध्ये कीटकनाशकांचे महत्त्व उत्पादकता वाढवण्यासाठी असते हे लक्षात घेऊन त्यांनी त्यासंबंधी संशोधन सुरू केले. वैज्ञानिक संशोधन व विकासाच्या क्षेत्रातील अनेक करार करण्यासाठी गेलेल्या परदेशी पथकांचे त्यांनी नेतृत्व केले आहे. देशी-परदेशी नियतकालिकांतून त्यांचे एकूण २०० निबंध प्रसिद्ध झाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..