नवीन लेखन...

आधुनिक युगातील शिक्षणाचे महामेरू व कॉग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम

गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना चार ते पाच किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४५ रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. १९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.

सुरूवातीच्या जडणघडणीच्या काळात भारती विद्यापीठाच्या कार्याचे क्षेत्र, केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित आणि इंग्लिश विषयांच्या प्रमाणपत्र परीक्षा घेण्यापुरतेच मर्यादित होते. मुख्यतः, या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, हा दृष्टिकोन ठेवूनच हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यांच्या समर्थ, चैतन्यशील आणि अतिशय कल्पक अशा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठाने आपल्या उपक्रमांचा विविध दिशांनी विस्तार करायला सुरूवात केली आणि आज ते, बालकमंदिर ते विद्यापीठ शिक्षण असे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र व्यापणार्‍या, १८० शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेल्या विशाल संस्थात्मक जाळ्यामध्ये विकसित झाले आहे.

भारती विद्यापीठाला एक परिपूर्ण विश्वविद्यालय म्हणून विकसित करणे’, हे विद्यापीठाच्या मेमोरन्डम ऑफ असोसिएशन मधील ध्येयांपैकी एक होते. त्यावेळच्या २० वर्षे वयाच्या या तरुणाने आपले स्वप्न त्यानंतर ३२ वर्षांनी, १९९६ मध्ये, जेव्हा भारत सरकारने भारती विद्यापीठाच्या संस्थांच्या समूहाला विश्वविद्यालयाचा दर्जा प्रदान केला त्यावेळी, सत्यात उतरलेले पाहिले. डॉ. कदम यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक होणे, हे या महत्त्वाच्या टप्प्याचे वैशिष्ट्य होते – अक्षरशः राखेतून उभारी घेऊन सर्वोच्च स्थानी पोहोचणाऱ्या एका शेतकर्‍याच्या मुलाचे हे यश थक्क करणारे होते.

सुरूवातीच्या काळात, भारती विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश आणि गणित विषयांच्या परीक्षांचे आयोजन करण्यापुरतेच मर्यादित होते. डॉ. कदम यांच्या चैतन्यशील आणि द्रष्ट्या नेतृत्वाखाली, ४३ वर्षांच्या कालावधीत, आपल्या छत्राखाली १८० शैक्षणिक संस्था असलेले भारती विद्यापीठ, भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वदूर मान्यता पावलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी एक, म्हणून बहरास आले. वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, व्यवस्थापन, औषधीनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी, आर्किटेक्चर, विधी, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इ. चा समावेश असलेल्या जवळपास सर्व मुख्य परंपरागत आणि उदयोन्मुख विद्याशाखांचे शिक्षण देणारी ६५ महाविद्यालये आणि संस्था, या विश्वविद्यालयाद्वारे चालविल्या जातात.

भारताच्या राजधानीचे शहर, नवी दिल्ली, येथे शैक्षणिक संस्थान सुरू करणाऱ्या महाराष्ट्रातील अत्यंत मोजक्याच राजकारण्यांपैकी, डॉ. कदम हे एक आहेत. डॉ. कदम यांनी अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाना, सहकारी ग्राहक भांडार, बहुराज्यीय शेडयुल्ड बँक इ. चा समावेश होतो. या सर्व संस्था यशस्वीपणे कार्यरत असून ग्रामीण शेतकर्‍यांच्या कल्याणात साहाय्यभूत झाल्या आहेत. त्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांकरिता वसतीगृहे देखील स्थापन केली आहेत.

त्यांनी ग्रामीण लोकांच्या गरजांच्या पूर्तीसाठी, प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि सहकारी केंद्रांची स्थापना केली आहे. भारती विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांमधील अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना जवळ जवळ मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. शिक्षण मंत्री असताना, त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात स्तुत्य कार्य केले आहे.

भारती विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांमधील अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना जवळ जवळ मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. भारती विद्यापीठ हे केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशभरातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, असे डॉ. पतंगराव कदमांना वाटते आणि म्हणूनच ‘चैतन्यशील शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन’ हे ध्येयवाक्य भारती विद्यापीठाने आपल्या प्रारंभापासूनच अंगिकारले आहे.

डॉ. पतंगराव कदम यांनी प्रथम, महाराष्ट्र मंत्रीमंडळात राज्य मंत्री म्हणून जून १९९१ ते फेब्रुवारी १९९३ पर्यंत काम केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, तंत्रशिक्षण, जलसिंचन, जलप्रदाय क्षेत्र (कमांड एरिआ) विकास, माजी सैनिक कल्याण यांसहित विविध खाती वाखणण्याजोग्या रितीने हाताळली. त्यांनी शालेय शिक्षण विभागाचा स्वतंत्र प्रभारही सांभाळला.

त्यानंतर, त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती होऊन त्यांना उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार ही खाती देण्यात आली. त्यांचा उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार मंत्री म्हणून कार्यकाळ, त्या काळात पारित झालेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे विशेष लक्षणीय ठरला व त्या निर्णयांचा दूरगामी विधायक प्रभाव या क्षेत्रात पडला आणि त्यांच्यातून, त्यांनी हाताळलेल्या विषयांबाबतची त्यांची दूरदृष्टी आणि सखोल ज्ञान प्रतिबिंबित झाले.
डॉ. कदम महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत (१९८५-९०, १९९०-९५, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१० आणि २०१० पासून पुढे). ऑक्टोबर २००४ मध्ये ते महाराष्ट्रातील भिलवडी-वांगी मतदारसंघातून १,०१,९०० च्या फरकाने पुन्हा निवडून आले. निवडणुकीत देण्यात आलेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता, त्या निवडणुकीमधील सर्व यशस्वी उमेदवारांच्या यादीत ते अग्रस्थानी होते.

प्रचंड मतसंख्येच्या बाबतीत, महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून त्यांनी अतिशय हेवा करण्याजोगा विक्रम नोंदविला आहे. एक कार्यक्षम, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये आपली छाप बसवली आहे. कृषी विकास, उच्च शिक्षण, ग्रामीण आणि शहरी समस्या, सहकारी उपक्रम, जलसिंचन, वित्तव्यवस्था आणि तत्सम इतर क्षेत्रांतील आपल्या सखोल ज्ञानाने त्यांनी विविध राज्यस्तरीय समित्यांवरील आपल्या सहकार्‍यांनाही प्रभावित केले होते. पतंगराव कदम यांचे ९ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..