‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी डॉ. राजेंद्रसिंह यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) येथे झाला.
डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. १९७५मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘तरुण भारत संघ’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जलसंवर्धनाचं खूप मोठं कार्य उभारलं आहे. राजस्थानात थर वाळवंटानजीकच्या गावांमध्ये पाणी साठवण्यासाठीच्या ‘जोहड’या पारंपरिक रचनांसोबतच छोटे बंधारे वगैरेंच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी त्यांनी लोकांना मार्गदर्शन आणि साह्य केलं. या संदर्भातल्या कामाची सुरुवात १९८५ मध्ये एका गावापासून झाली.
आजवर ८६००हून अधिक जोहड उभारली गेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गावकरी जलस्वयंपूर्णतेसाठी एकत्र येऊ लागले. आज सुमारे एक हजार गावांमध्ये पाणी परत आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. तसंच, राजस्थानातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवनही शक्य झालं आहे. राजस्थानातल्या अल्वर जिल्ह्यात त्यांचं काम मोठं आहे.
या क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दाखल घेऊन २०१५ साली डॉ.राजेंद्रसिंह यांना ‘नोबेल’च्या दर्जाचं मानलं जाणारं दीड लाख डॉलर्सचं ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ मिळालं आहे. तसंच रेमन मॅगसेसे पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार आणि अहिंसा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
डॉ.राजेंद्रसिंह यांची वेबसाईट. http://tarunbharatsangh.in/
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply