डॉक्टर पॅट्रिक मॅन्सन हा उष्ण कटिबंधातील रोगांचा तज्ञ होता .रॉस व मॅन्सन यांची प्रत्यक्ष भेट झाली तेव्हा मॅन्सनने त्याला लॅव्हेराननेसादर केलेल्या काचपट्टी वरील मलेरियाच्या परोपजीवींची क्रिसेंट अवस्था प्रत्यक्षात दाखवून दिली. रॉसला आता त्याची चूक कळली. त्याचा भ्रमनिरास झाला.भारतात असताना रॉसला क्रिसेंट अवस्थेतील परोपजीवी मायक्रोस्कोप मधून कसे दिसतात याचा अनुभव नव्हता . रॉसच्याउद्धट व मनमानी स्वभावानुसार त्याने स्वतः केलेल्या टीकेबद्दल मौनच राखले . अशा या विचित्र प्रसंगात मॅन्सनने रॉसला सांभाळून घेतले. यामागेही एक छुपे कारण असे होते की रॉस व मॅन्सन हे दोघेही ब्रिटिश होते व लॅव्हेरान हा फ्रेंच शास्त्रज्ञ होता.
मॅन्सन हत्तीरोगावर काम करीत असताना त्याच्या असे लक्षात आले होते की हा रोग डास चावल्याने होतो. रॉसशी गप्पागोष्टी करताना जाता जाता मॅन्सनने उल्लेख केला मलेरिया सुद्धा डासामुळे होत असावा सहजपणे उद्गारलेल्या एका वाक्याने रोजच्या संशोधनाला नवीन दिशा मिळाली.
मॅन्सनने डास हा मलेरियाचा तापास कारणीभूत आहे असा सिद्धांत प्रथम व्यापक स्वरूपात मांडला . डास जेव्हा मलेरिया झालेल्या रुग्णाचे रक्त शोषतो त्यावेळी रुग्णाच्या शरीरातील क्रिसेंट स्थितीमधील परोपजीवी हे रक्तातून डासाच्या शरीरात सर्वत्र पसरतात . डासाच्या शरीरात तयार होणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या अंड्यात हे परोपजीवी जिवंत राहतात . डास पाण्याच्या डबक्यात काही कालावधीनंतर मरण पावतात व ही अंडी परोपजीवी सहित पाण्यात तरंगू लागतात . जी माणसे अशा डबक्यातील पाणी पितात त्यांच्यात काही दिवसानंतर मलेरियाची लक्षणे दिसू लागतात .
वरील मॅन्सनचा सिद्धांत खरा आहेअसे मानून रॉसच्या मनाचीबालंबाल खात्री पटली की डास व मलेरियाचे परोपजीवी यांचे घनिष्ठ नाते आहे. या पार्श्वभूमीवर डासांवर अथक प्रयोग करण्याची गरज निर्माण झाल्याचे रोसने ओळखले वयात अत्यंत गुंतागुंतीच्या किचकट कामात त्याने स्वतःला अक्षरशः झोकून दिले.
या ठिकाणी एक गोष्ट नमूद करणे इष्ट आहे . दुर्दैवाने रॉसने डासांवरील प्रयोगकरताना हे गृहीत धरले होते की मनुष्याला चावणारा प्रत्येक डास मलेरियाचा प्रसार करतो . डासांच्या जाती , पोट जाती ओळखण्याचे ज्ञान रॉस व मॅन्सन या दोघांनाही अवगत नव्हते पूर्णविराम मलेरियाचे परोपजीवी मनुष्याचा रक्तापर्यंत पोहोचवण्याचे काम फक्त आणि फक्त ऍनॉफेलिस डासाची मादी करते हे निसर्गाचे रहस्य तोपर्यंत त्यांना उलगडलेले नव्हते.
मॅन्सनचा डासावरील प्राथमिक सिध्दांत रॉसने इतका मनावर घेतला की त्याला जळी-स्थळी डासच दिसत होते. आजुबाजुचे लोक त्याला डासांमुळे वेड लागलेला रॉस म्हणून ओळखू लागले. या कामात पूर्णपणे गुंतून राहण्याच्या विचाराने आपली पावले त्याने पुन्हा भारताकडे वळवली.
Leave a Reply