अगदी पुराणात सुद्धा ज्याचा उल्लेख आहे आणि नेहमी जोडीने (जोडप्याने )जो फिरतो . जो आपल्या जोडीदाराला मरे पर्यंत सोडत नाही.दोघांपैकी एकच मृत्यू झालातर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो.पायाची नखे ते चोच अशी किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भातशेतातच स्वत:चं घर करणारा अन् त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाचं अंड घालून प्रजातींची संख्या वाढवणाऱ्या आणि गम्मत म्हणजे अंडी उबवण्याचा अधिकार फक्त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत अंडे उबणारा नर पक्षी, या पक्षाचे नाव आहे सारसपक्षी. या सारस पक्ष्यांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड कोसळत होती. २००० पर्यंत नामशेष होण्याच्या मार्गावर सारस होता. केवळ चार जोड्याच शिल्लक होत्या.
असे म्हणतात कि ज्यांचे पटत नाही अशा भांडणा-या पतीपत्नीला या सारस पक्षाच्या सान्निध्यात ठेवण्याची प्रथा भारतात एकेकाळी होती.करड्या रंगाचा ,लालभडक मान असलेला पक्षी याला एका शिका-यांनी मारताना वाल्मिकी ऋषींनी पहिला .वाल्मिकी ऋषींना खूप वेदना झाल्या . त्यांनी त्या शिका-यास शाप दिला आणि त्या तडफडून मरणा-या पक्षाला पाहून त्यांना ‘रामायण’ हे महाकाव्य सुचले अशी कथा आहे. असे म्हणतात एकमेकांसाठी जीवनभर जगणा-या सारस पक्षाच्या जोडीला पाहून त्यांना प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या एकनिष्ठ प्रेमाची कथा लोकांना सांगावीशी वाटली . हि सारस पक्षाची जोडी अशी रामायण काळा पासून प्रसिद्ध आहे.रामायण हे महाकाव्य म्हणजे एक शोकांतिकाच आहे. विवाह झाल्यापासून त्रास ,वनवास, वियोग या वेदना रामायणात आहेत.प्रभू रामचंद्र आणि सीतेचा विवाह हा पुष्य नक्षत्रावर झाला होता.विवाह झाल्यानंतर त्यांना आजन्म वेदना आणि विरहच सोसावा लागला म्हणून कितीही शुभ असले तरी पुष्य नक्षत्र विवाह साठी वर्ज्य समजले जाते. .पतीपत्नी मध्ये सारस पक्षा सारखी निष्ठा असावी म्हणून भारतात न पटणा-या जोडप्याला या पक्षाच्या सान्निध्यात ठेवतात.
असे म्हणतात कि जहांगीर बादशहा यांनी हे पक्षी पाळले होते. दुधात पाव भिजवून जर या पक्षांना दिले तर हे पक्षी पावाचा तुकडा पाण्यात बुडवून धुतात आणि दुध वेगळे झाल्यावर पाव खातात.एकाद्या इमानी कुत्र्या सारखे माणसांच्या मागे हे पक्षी चालतात. उभ्या पिकातलं भात दाणे हे पक्षी खातात म्हणून शेतकरी या पक्षांना शेतात येऊ देत नाहीत. परंतु काहीही असले तरी अत्यंत आश्चर्य कारक या पक्षांचे जीवन असते.
संपूर्ण जगात हे पक्षी नामशेष होत आहेत. भारतात तर फक्त ४ जोड्या शिल्लक राहिल्या होत्या. गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या नेहमीच्या रुक्ष कामातून वेळ काढला आणि हे पक्षी वाचवण्यासाठी पक्षी प्रेमी संघटनांच्या मदतीने या पक्षांचे संगोपन करून त्यांची संख्या वाढवली .
एक जिल्हाधिकारी काय करू शकतो याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे . आपल्या देशात असे अनेक अधिकारी आहेत कि ज्यांच्या कार्याला जनतेच्या शाब्बासकीची फक्त गरज असते. त्यांच्या कामाला आपण उत्तेजन दिले पाहिजे.अतिशय दुर्मिळ आणि वाल्मिकी मुनींना प्रिय असलेल्या सारस पक्षांना वाचवणा-या जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांना सलाम !!!!
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply