मूळ मेक्सिको देशातील ड्रॅगनफ्रूट या फळपिकाची लागवड पूर्व आशिया खंड, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशियाई देश आदी ठिकाणी केली जाते. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत या फळपिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.
ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. मूलतः मध्य अमेरिकेपासून ते थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, बांगला देश आदी ठिकाणी ते यशस्वीरीत्या व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. आता ते भारतातही येऊन पोचले आहे. काही प्रमुख आशियाई देशांत त्याची लागवड कशा प्रकारे केली जाते, याबाबत काही महत्त्वाची माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.
ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस (Hylocereus) ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून लाल रंग आतील गर पांढरा, वरून लाल रंग आतील गर लाल व वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा अशा तीन तीन प्रकारांत हे फळ येते. ड्रॅगनफ्रूटला आशियाई देशांत पिताहाया किंवा पिताया (pitahaya किंवा pitaya) या नावानेही संबोधले जाते.
मूळ फळ मेक्सिकोचे
हे फळ मूळचे मेक्सिकोचे असल्याचे मानले जाते. तेथून ते मध्य अमेरिका व जगभरातील अन्य देशांत प्रसारीत झाले. हे पीक जगभरात उष्णप्रदेशीय देशांमध्ये घेतले जाते. याची वेल छत्रीसारखी दिसते. याला वाढीसाठी द्राक्षांप्रमाणे आधाराची गरज असते. साधारणतः या वेलीची आयुष्यमर्यादा 15 ते 20 वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्या यांची निवड महत्त्वाची आहे. मूलतः पोषक जमीन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्यापासून योग्य उत्पादन घेता येते.
ड्रॅगन फ्रूट पिकाची ठळक वैशिष्ट्ये
– किमान पाणी देणे आवश्यक
– किमान देखभालही गरजेची
– भारतीय हवामान पोषक
– स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी
उपयोग –
– “ड्रॅगन फळ’ मधुमेह नियंत्रित करते.
– शरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
– संधिवात रोखण्यास मदत करते.
– दमा रोखण्यास मदत होते.
– यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.
लागवड पद्धत
जमीन- या फळपिकासाठी जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम व जमिनीचा सामू 6.1 ते 7.5 च्या दरम्यान असावा.
जमिनीची पूर्वमशागत- नांगरणी मध्यम खोल व तणमुक्त करावी. जमिनीची नीट उभी-आडवी नांगरट करून कुळवाच्या आडव्या-उभ्या दोन पाळ्या देऊन, धसकटे, तण वेचून जमीन स्वच्छ व भुसभुशीत करून घ्यावी.
लागवडीची पद्धत –
ड्रॅगन फ्रूट ची लागवड आता रोपाच्या साह्याने केली जाते रोपाची निवड करताना ती रोग व कीडमुक्त असावी.
लागवडीचे अंतर –
दोन झाडांतील व ओळींतील अंतर 2 बाय 2 मीटर असावे. लागवडीसाठी 60 बाय 60 बाय 60 सेंमी. आकाराचे खड्डे घेऊन ते माती, शेणखत व 100 ग्रॅम फॉस्फेटने (प्रति खड्डा) भरून घ्यावेत.
वनस्पती घनता
एका एकरामध्ये जवळपास 1700 रोपे घेता येतात.
shivraj ghongade mob no-9422437536
मला ड्रॅगन फ्रूट च्या तापमान बद्दल माहिती हवी आहे..
उन्हाळ्यात विदर्भातील तापमान सुट होईल काय..
Sir I am interested please teach mi.
मी पण इच्छुक आहे
मो.9325922783
वाटसप नं.7391955086
sir .where do you get this plant
sir .where do you get this plant
सर हे फळ कोणत्या कालावधीत येतं…
1 रोप लावल्या नंतर 1 वर्षांनी फळ येते
2 1करी 3.5ते 4 लाख रुपये
3 बटन स्टेज पासून साधारण 90 दिवस फुल उमल्लेके 40 ते 45 दिवस
आणखी माहिती साठी कॉल करा whatasapp9403180397/
कॉल 9834850481
आय एम इंटरेस्टेड
मला खालील प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील का?
१) रोप लावल्यानंतर किती महिन्यांनी फळ लागते?
२) सरासरी मासिक खर्च किती असतो एक एकेरी साठी ?
३) फळ पिकण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो?
12 months
No manthaly pro. Cost one time Invesment
31dayes from flower to frout is readyto cutting 6 time in one year
I am from satara I am former leady i intrested in drigan fruit farm. Contact 8805627871
Yes, it’s only for leady farmer,
pensioncrop,
It’s
Doesn’t require crop