दत्ता भटांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला.
दत्ता भट हे मराठी रंगभूमीवरील एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांतून अजरामर भूमिका केल्या. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटच्या ४०० प्रयोगांमध्ये दत्ता भट हे गणपतराव बेलवरकरांच्या भूमिकेत होते. नटसम्राट मधील अप्पा बेलवलकर हे पात्र दत्ता भट यांनी अप्रतिम पणे केले. अत्यंत प्रभावी आवाज, अचूक शब्दफेक आणि पाठांतर. हृदयाला हात घालणारा अभिनय. ही भूमिका दत्ता भट अक्षरशः जगले. त्यानंतर प्रकृति अस्वास्थ्यामुळे त्यांनी ती भूमिका सोडली. “सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. या चित्रपटातील दत्ता भट हे सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतात, त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त होती. आज ही सिंहासन चित्रपट बघताना दत्ता भट यांनी साकारलेला माणिकराव हा जबरीच वाटतो.
दत्ता भट यांच्या बद्दल वि.वा शिरवाडकर म्हणायचे, ” सोन्याला भट्टीत घालतात त्याचं दुःख होत नाही. ऐरणीवर ठोकतात त्याचं दुःख होत नाही. त्याचं दागिन्यात रुपांतर करताना सोन्याला मनस्वी यातना होतात त्याचंही दुःख त्याला होत नाही. पण जेव्हा त्याची तुलना गुंजेबरोबर केली जाते तेव्हा मात्र सोन्याला अपार दुःख होतं. भटांना गुंजेबरोबर तोलून घ्यायचं नव्हतं आणि नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांनी संघर्ष, विदूषक, नटसम्राट, भोवरा, भल्याकाका, मी जिंकलो मी हरलो, अखेरचा सवाल,बिऱ्हाड बाजलं, सूर्याची पिल्ले, मंतरलेली चैत्रवेल, बॅरिस्टर अशा अनेक नाटकात भूमिका केल्या. दत्ता भट यांनी डॉक्टर लागू, तुझे आहे तुजपाशी, फुलाला सुगंध मातीचा, आणि वेडा वृंदावन या नाटकांचे दिग्दर्शन केले होते,तसेच त्यांनी “आम्ही जातो आमच्या गावा, चूल आणि मूल, रामनगरी(हिंदी), गोलमाल( हिंदी) अशा अनेक चित्रपटात कामे केली होती.
दत्ता भट यांचे ’झाले मृगजळ आता जलमय’ या नावाचे आत्मचरित्र ’ प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांचे ’जेथे जातो तेथे’ हे पुस्तकही आहे.
दत्ता भट यांचे १ एप्रिल १९८४ रोजी निधन झाले.
Dear Mr Velankar, I am the son in law of Late Datta Bhat ,appreciate you writing so much and so articulate about my late father in law Datta Bhat, I am searching for the Natasamrat broadcasted 1973 by Door Darshan and many other dramas ,interviews of him,Apple Maran pahile mya Dola.Kindly let me know how to retrieve.
Warm Regards
D R Kulkarni