नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – आकांत

गावरान ढगांतले, महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनावर त्यांच्या जीवन पद्धतीवर बेतलेले अनेक सिनेमे आपल्याकडे झाले, काही चालले तर काही शहरी तसंच ग्रामीण वर्गातील प्रेक्षकांना भावले पण हल्लीचे जे गावरान बाज असलेले चित्रपट येतात त्यातले खूपच कमी व्यावसायिक तसंच रंजकतेन परिपूर्ण असतात. कदाचित सशक्त कथेचा अभाव हेच मुलभूत कारण असेल असं म्हणाव लागेल.

१५ मार्चला प्रदर्शित झालेल्या आकांत ह्या चित्रपटाचं संपूर्ण कथानक ग्रामीण जीवनातील एक भयावह वास्तव मांडणारं आजही ग्रामीण समाजात किती अनिष्ट प्रथा आणि रुढी प्रचलित आहेत. याच्यावर अगदी नेमकेपणाने भाष्य करणारा पारधी दुर्लक्षित, उपेक्षित समाजावर काही अंशी प्रकाश टाकण्याचे काम “आकांत” मधून रेखाटलय.

चित्रपटात नायक म्हणजे चवळ्याची भूमिका साकारलीय ती मिलींद शिंदे यांनी. तर जुलमीची व्यक्तीरेखा आदिती सारंगधर यांनी अगदी उत्तमरित्या या चित्रपटात आपली कामगिरी बजावलीय. तर चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, पटकथा आणि गीतकार म्हणून मानसिंग पवार यांचा प्रयत्न थोडासा स्तुत्यास्पद आहे, कारण यामध्ये त्यांनी केलेलं संशोधन आणि अभ्यास या चित्रपटातून आपल्याला दिसतो.

पारधी समाजाची वस्ती, चोर्‍या मार्‍या करुन कधी दरोडा तर कधी खून करुन स्वत:च्या आयुष्याचा गाडा हाकणारी कुटुंब आणि त्यातच जुलमी आणि चवळ्याच्या डोक्यावर गावच्या पाटलाचं भरमसाट कर्ज आणि त्यातून पुढे निर्माण झालेला पेच, पण अशा प्रसंगात सुद्धा एकमेकांची साथ आणि जीवापाड असलेलं प्रेम अधोरेखीत करण्यात आलं आहे. वेळेवर चवळ्यानी पाटलाचं कर्ज फेडलं नाही तर जुलमीला पाटलाकडे गहाण ठेवावं लागेल, मग पुढे काय होतं? काय घडत जातं? हे पहाणं चित्रपटाच्या मध्यांतरानंतर उत्सुकतेचं ठरतं.

सुरुवातीला चित्रपट काहीसा संथ आणि निरस वाटतो, संकलनाच्या बाजू म्हणजे तांत्रिक दृष्ट्या अप्रगल्भ असल्याचं जाणवत कधी प्रकाश योजनेत तर कधी “डबिंग” मध्ये. चित्रपटात इतरही सहकलाकार आहेत पण छाप पाडून जाईल असा अभिनय साकारलाय तो आदिती सारंगधर आणि मिलिंद शिंदे यांनी चित्रपटाचं संगीत कथानकथेला शोभेल असंच आहे तर गायकांनी आपली कामगिरी चोख बजावली, पण एकूणच मार्केटिंग कमी पडल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नीट पोहचला नाही, थोडासा प्रमोशनवर भर दिला गेला असता तर प्रेक्षकांना सुद्धा कळेल की महाराष्ट्रातल्या विविध समाजाचं वास्तव जीवन काय असतं.

तरी निर्माता, दिग्दर्शक यांच्यातर्फे कथेतून आशय पोहचवण्याचं उद्दीष्ट आकांत मधून त्यांच्या दृष्टीनं पूर्ण झाल्याचं दिसत आहे; तरीपण हा चित्रपट चांगला झाला असता जर अनावश्यक दृश्य किंवा “तोच तोच संवाद पुन्हा आला नसता तर;”

तरीसुद्धा चित्रपट पहाताना कंटाळवाणा वाटणार असा आकांत हा सिनेमा नाही. चित्रपट पाहिल्यावर महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनातल्या विश्वावर, प्रेक्षकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावेल, हेच या चित्रपटाचं वैशिष्ट्य सांगता येईल.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..