नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – एकुलती एक

इमोशनल काहीसा ड्रामॅटिक, थोडा रोमॅंटिक, आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी असलेला, परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट म्हणजे “एकुलती एक” या चित्रपटाची तशी बर्‍यापैकी पब्लिसिटी आणि चर्चा ही झाली होती, कारण अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची कन्या श्रीया पिळगांवकर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे, मराठी चित्रपटाला यानिमित्ताने एक नवखा आणि “अस्सल कलाकार” मिळणार हे श्रीयाच्या पहिल्याच चित्रपटातून लक्षात येत आहे. असो पण आणखीन एक कमालीची गोष्ट जी या चित्रपटाची म्हणावी लागेल, ती म्हणजे जाहिरात बाजीतून, प्रमोज मधून ज्या पद्धतीनं आपण या चित्रपटाचं चित्र डोळ्यासमोर उभं करतो, त्यापेक्षा कितीतरी वेगळ्या पट्टीतला हा सिनेमा असल्याचं पाहिल्यावर कळतं, अर्थात वैशिष्ट्यपूर्ण प्रचार हा आपल्याकडे हळूहळू रुजतोय, एका अर्थाने चित्रपटांसाठी महत्वपूर्ण बाब म्हणता येईल.

सचिन पिळगांवकर यांचा चित्रपट म्हणजे सर्वार्थाने वेगळा असतोच, आणि प्रेक्षकांची दाद सुद्धा त्यामुळेच मिळत रहाते हे त्यांनी दिग्दर्शित, निर्मिती केलेल्या चित्रपटांतून लक्षात येतं. नेमकं हेच वैशिष्ट्य हा चित्रपट पहाताना लक्षात येईल. म्हणजे श्रीया पिळगांवकर या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून सुरुवात अगदी मजेशीर अवखळपणे आणि चित्रपटातील इतर पात्रांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरते, यामध्ये मेहता या सचिवाची व्यक्तिरेखा साकारणार्‍या अशोक सराफ तर नायकाच्या भूमिकेत असणारे अरुण देशपांडे म्हणजे सचिन पिळगांवकरांची एंट्री होते २० वर्षांनी आपल्या मुलीला भेटल्यानंतर एका वडिलांचं मन या प्रसंगाला कसं सामोरे जातं, हे दाखवल्यानंतर हळुहळू मजेशीर, हृदयस्पर्शी, विनोदी प्रसंगातनं कथा पुढे सरकते, आणि प्रेक्षकांसमोर मूळ आशय उलगड

ो.

या चित्रपटाची कथा इतकी प्रभावी आहे की, नवोदित श्रीया पिळगांवकर हीला त्याचा उपयोग होईल, (म्हणजे अभिनयाची चुणूक दाखवता येईल) आणि उत्तरार्धापर्यंत तशाच विषयाची निवड ही करण्यात आली आहे. पण श्रीया पिळगांवकर नी अगदी चोखपणे स्वराचं पात्र साकारत रसिकांची वाव्हा मिळवल्याचं चित्रपट पाहताना लक्षात येतं, कुठेही “ओव्हर अॅक्टिंग” नाही, अनावश्यक गोष्टींचा भडीमार नसल्याचं हा चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. दिग्दर्शकाला, लेखकाला कोणता आशय पोहचवायचा आहे हे समजल्यामुळे पदार्पणातच श्रीयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटतो.
सहकलाकार, पाहुणे कलाकारांची निवड योग्य असल्याचं कळतं. अशोक सराफ यांची गुजराती सचिवाची व्यक्तिरेखा विनोदी, थोडीशी गंभीर अशी म्हणता येईल, पण एकूणच उत्तम! त्याचबरोबर किशोरी शहाणे यांची व्यक्तीरेखा ही नेमकीच कुठे एक्झिट घ्यायची हे बोरबर लक्षात आल्याने, चित्रपटाचा बाज शेवटपर्यंत टिकून राहतो. जनरेशन गॅप, आई वडिल आणि त्यांच्या मुलांशी असलेले नाते संबंध, कौटुंबिक जबाबदार्‍या व रात्रं दिवस कामाच्या जीवनशैली मुळे होत जाणारा परिणाम यावर अगदी अचूकपणे, पण प्रेक्षकांना कोणत्यातरी ठराविक विषयात न अडकवता भाष्य होत राहतं.
चित्रपट साकारताना विषय स्पष्ट असल्यानं, तो भरकटला जात नाही, त्यामुळे तो रटाळ वाटण्याचा ही प्रश्नच येय नाही. सुप्रिया पिळगांवकर यांची नंदिनी देशपांडे ही भूमिका ३ ते ४ सीन्स पुरती असली तरी छाप उमटवणारी ठरते.
नवोदित कलाकार सिद्धार्थ मेनन चं काम ही योग्यच आणि त्या वयातील व्यक्तीरेखेला शोभणारं आहे.
वडिल-मुलीचं नातं अगदी हळुवारपणे उलगडत आणि इतक्या वर्षाच्या भेटीनंतर ही, त्यांच्यातील प्रेमाचा ओलावा कायम आहे. हेच चित्रपटातून जाणवतं, सचिनजी आणि त्यांच्या मुलीचं प्रत्यक्ष आयुष्यातलं नातही अशाच पद्धतीचं असेल का? असा प्रश्न ही प्रेक्षक हा चित्रपट पहाताना स्वत:शीच विचारण्याची शक्यता आहे.
चित्रपटाची गीतं, संगीत, तांत्रिक बाबी सुद्धा समर्पक असून, तरुण पिढीला समोर ठेवून गाण्यांची रचना झाली आहे.
तरीसुद्धा पटकथेत उणीवा आहेच आणि सुरुवातीची काही वाक्य आणि संवाद अनावश्यक वाटतात विशेषत: सुप्रिया पिळगांवकरांची आणि मुख्य म्हणजे तीला अधिकाधिक फोकस करण्याचा दिग्दर्शकाकडून अट्टाहास ही झाल्याचं जाणवत राहतं. पण सशक्त अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काहीच शंका नाही.
एकूणच सचिन पिळगांवकर यांच्या प्रोफेशनल लाईफशी म्हणजे त्यांच्या अभिनय, गायक या कारकिर्दीशी जवळीक साधणारा असल्यानं तसंच घरचं वातावरण आणि मोजक्याच कलाकारांना घेऊन सिनेमाची रुपरेखा असल्यामुळे “एकलुती एक” चं शिवधनुष्य अगदी उत्तमपणे पेललं आहे.
श्रीया पिळगांवकर भविष्यात स्वत:ची ओळख बनून एक समर्थ अभिनेत्री म्हणून आपल्यासमोर येईल, असं चित्र सध्यातरी हा चित्रपट पाहिल्यावर जाणवतय, थोडक्यात हलका-फुलका आणि विकेण्डला “परफेक्ट टच” देणारा असा चित्रपट आहे. त्यामुळे मनोरंजनासाठी एकुलती एक म्हणजे सिम्पली पैसा वसूल.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..