नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – “टाइम प्लीज-गोष्ट लग्ना नंतरची”

सध्या आपल्याकडे “युथफुल” चित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतोय, विशेष म्हणजे अशा कथांना प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे कारण म्हणजे फर्स्ट लुक मधून केलेलं मनोवेधक मार्केटींग आणि साचेबद्ध पद्धतीच्या बाहेरचे असलेले विषय असल्याचं पटवून देणं, या फंड्यामुळे सध्या बर्‍यापैकी आपल्या मराठी चित्रपटांना हिट्स मिळत आहेत असाच एक युथफुल, हलकी-फुलकी कॉमेडी व रोमॅण्टीक पण तरुण पिढीच्या नातेसंबंधांवर भाष्य करणारा सिनेमा म्हणजे “टाइम प्लीज-गोष्ट लग्ना नंतरची”.

ही गोष्ट आहे हृषिकेश (उमेश कामत) आणि अमृता साने (प्रिया बापट) नावाच्या नवोदित जोडप्याची, संसारात थोडे नाविन्यपण येऊ लागलं असलं तरीपण, अमृताचा बालीशपणा, त्यानंतर तिचा बालमित्र हिंमतराव पाटील (सिद्धार्थ जाधव) ची झालेली एंट्री असेल यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीपासून धम्माल येत राहते. हिम्मतराव पाटील याचं वावरणं खुपच बिनधास्त असल्यामुळे अमृताचा त्याच्याशी लग्नानंतरची घट्ट मैत्री हृषिकेश ला खटकू लागते यातून संशयाचं जाळं विणलं जातं. अशातच हृशिकेष ची मैत्रिण राधिका (सई ताम्हणकर) ची एंट्री होते, ती आय.टी. प्रोफेशनल म्हणून हृषीकेश काम करत असलेल्या कंपनीमध्ये, ज्यातून राधिका आणि हृषिकेशच्या पुन:श्च मैत्रीच्या आयुष्यात नव्यानं वळण मिळतं.
चित्रपटाला तगडी स्टार कास्ट आहे, तांत्रिक बाजू उत्तमपणे हाताळल्या गेल्या, संवादात सहजता असल्यामुळे तरुण पिढीला आपला वाटणारा चित्रपट वाटू शकतो. लग्नानंतर आजही दोन स्त्री-पुरुषांच्या मध्ये मैत्रीचं घट्ट नातं असून शकते हे अजुनतरी आपल्या समाजात फारशी न रुचणारी गोष्ट आहे असं म्हनावं लागेल, चित्रपटात नेमकी हीच बाब अधोरेखीत करण्याचा प्रयत्न झाला असला तरीही उत्तरार्धात त्याची “कन्टीन्युटी” रहात नाही व चित्रपट खूपच लांबल्या सारखा वाटतो.
“नात्यांमधील स्पेस”, “तडजोड”, “पालक” तसंच त्यांची मुलं यामधील निर्माण झालेला विसंवाद , लग्नानंतर होणारी फरफट यावरती सिनेमानी अगदी मुलभूत पातळीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील संगीत उत्तम, गाणी सुद्धा अप्रतिम, दिल खेचक विशेष म्हणजे योग्य सिन्सच्या वेळी गाणी रिप्लेस केली गेल्यामुळे कथेमध्ये प्रवाह टिकून रहातो. कारण त्या “मुडस” ना शोभणारी अशी गीतरचना करण्यात आली आहे.
कथेतील काही बाबी खटकणार्‍या तर आहेतच पण विचार देखील करायला लावणार्‍या असून, अशा योगायोगाच्या गोष्टी कशा घडू शकतात, विशेषत: राधिकाचं हृषीकेश काम करत असलेल्या कंपनीत रुजू होणं. सिद्धार्थ जाधव नं हिम्मतराव पाटीलचं पात्र छान सादर केलं आहे. तरीपण वैज्ञानिक म्हणून कोणत्याच अंगानं छबी वाटत नाही एखाद्या, खेडवळ व्यक्ती प्रमाणेच ती वाटते, पण या भूमिकेला प्रेक्षकांचं पूर्वार्धात बर्‍यापैकी मनोरंजन होतं, चित्रपटाचा शेवटचा सीन जिथे हृषिकेश व अमृता एकत्र भेटतात तो क्षण ही “इंटरेस्टींग” असला तरी अनपेक्षित असतो.
चित्रपटात सीमा देशमुख, वंदना गुप्ते, माधव अभ्यंकर यांच्याही भूमिका आहेत. प्रत्येक कलाकारानं या चित्रपटामधून पुरेपूर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे “आर्टिस्टिकली” चित्रपट उत्तम ठरतो.
व्याप्ती थोडी लांबली आहे, जी टाळता येण्यासारखी होती. मनोरंजन म्हणून थोडे विनोदी किस्से, अधुन-मधून आजच्या तरुण पिढीच्या मर्मावर बोट ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. तरीही कथेत अगदीच नाविन्य नाही.
एक मात्र खरं आहे की सिनेमामध्ये आजच्या जीवनशैलीवर भाष्य केल्यामुळे प्रेक्षकांना तिटकारा नक्कीच वाटणार किंवा ते बोअर ही होणार नाही; कुठेतरी मनाच्या जवळ जाणारा “टाइम प्लीज” सिनेमा वास्तव गोष्टींवर बोलत रहातो व वास्तवदर्शी आहे. त्यामुळे एकदातरी चित्रपट पहायला काहीच हरकत नाही.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..