नवीन लेखन...

नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे

डॉ.वि.भा.देशपांडे यांनी मॉडर्न महाविद्यालय तसेच पुणे विद्यापीठात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचा जन्म ३१ मे १९३८ रोजी झाला. नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. डॉ. वि. भा. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात वावरत होते. डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. त्यांची २०१५ सालापर्यंत ५१ पुस्तके प्रकाशित झाली होती. डॉ.वि.भांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे.

‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले ‘,‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’ , ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. नाटक, साहित्य, संगीत या गोष्टींवर नितांत प्रेम करणाऱ्या विभांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेल्या अनुभवावर त्यांनी पुस्तक लिहिले ‘नाट्यभ्रमणगाथा’. नाटके पाहण्यासाठी, नाटकांशी संबंधित माणसांना भेटण्यासाठी अनेक प्रांतांमध्ये त्यांनी भ्रमंती केली, त्याचीच ही भ्रमणगाथा. नाट्य-साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांना जवळून पाहता आले. अनेकांशी त्यांचा स्नेह, मैत्र जुळले. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्सना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशी अनेक मंडळी आहेत. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये वि. भा. देशपांडे यांनी ओघवत्या शैलीत लिहिली आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंगही त्यातून उलगडले आहेत. डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्नाीकर मतकरी यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. याआधी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम नाट्यवीर) व मोहन जोशी (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. वि.भा.देशपांडे यांचे ९ मार्च २०१७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

वि.भा.देशपांडे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान
आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा, कालचक्र : एक अभ्यास, नटसम्राट : एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यभ्रमणगाथा, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती), नाट्यव्यक्तिरेखाटन, पौराणिक-ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख), निवडक नाट्य मनोगते,मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी – स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ – रंगभूमीचा इतिहास (दोन खंड), माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान लोकनाटक, रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन, स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक,

वि.भा.देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार/सन्मान
उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार, जयवंतराव टिळक गौरव पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, माधव मनोहर पुरस्कार, रंगत-संगत सन्मान,राजा मंत्री पुरस्कार, वत्सलाबाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार, वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार, इंदिरा-भालचंद्र पुरस्कार.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..