ह्रदयद्रावक प्रसंग आला द्रौपदीवरी,
विटंबना करुं लागले कौरव जमुनी सारी ।।१।।
द्युतामध्यें हरले होते पांडव बंधू सारे,
द्रौपदीस लावले पणाला जेव्हां कांहीं न उरे ।।२।।
वस्त्रहरण करीत होता दुष्ट तो दुर्योधन,
हताश झाले होते पांडव हे सारे बघून ।।३।।
‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ धावूनी ये मी दुःखत पडे,
मदतीचा केला धांवा कृष्ण बंधूकडे ।।४।।
धावूनी आला कृष्ण द्रौपदीचे मदतीसाठी,
लाज राखली तीची उभे राहूनी पाठीं ।।५।।
‘कां उशीर केलास’ मदत देण्या मजला’ ,
लटका राग दाखवूनी प्रेमानें जबाब विचारला ।।६।।
‘बसलो होतो ‘तुझ्याच ह्रदयी ‘ अति जवळ,
संबोधितां मजला ‘ द्वारकेच्या कृष्णा ‘ येण्या झाला वेळ ’ ।।७।।
म्हटले असते ‘ ह्रदयातील कृष्णा ‘ ये धावूनी लवकर,
येथेंच होतो मी, मदत केली असती सत्वर ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply