सारेच संवाद व्यवहारी
आपलेपण उरले नाही
निष्ठुर कर्तव्य भावनां
ओलावा प्रेमाचा नाही
चिंतेत, जग गुरफटले
स्वास्थ्य कुणास नाही
विवेकी विचार लोपले
जीव्हाळा उरला नाही
सर्वत्र भोगवादी वृत्ती
सुखशांती उरली नाही
हेच वास्तव जीवनाचे
जगणेच कळले नाही
उलघाल मनभावनांची
साशंकता संपली नाही
अर्थ जगण्याचे बदलले
मानवताच उरली नाही
स्वसुखासाठी धडपड
प्रेमास्थाच जीवनी नाही
हा दृष्टान्त कलियुगाचा
इथे कुणी कुणाचे नाही
— वि. ग. सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४३.
२७ – ५ – २०२२.
Leave a Reply