नवा चित्रपट बघण्या गेलो, कुटुंबासह चित्र मंदिरी
चित्रगृह ते भरले असतां, प्रवेश मिळाला कसातरी….१,
चित्रपट तो बघत असतां, आश्चर्य वाटले जल्लोशाचे
टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक, कौतूक करी नटनट्यांचे….२
वास्तवतेला सोडूनी, रटाळपणे वाहत होते,
वैताग येवूनी त्या चित्राचा, सोडून आलो मधेच मी ते….३,
घरी येवूनी शांत जाहलो, आठवू लागलो बालपण
अशीच होती छायाचित्रे, ज्यांत आमचे रमले मन….४
जीवनामधल्या चक्रामध्ये, बदल फारसा होत नसतो
वयातल्या पायरीप्रमाणे, दृष्टीमध्ये फरक घढतो….५
–डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply