कोजागिरीची पौर्णिमा परि, आकाश होते ढगाळलेले ।
शोधूं लागले नयन आमचे, चंद्र चांदणे कोठे लपले ।।
गाणी गावून नाचत होती, गच्चीवरली मंडळी सारी ।
आनंदाची नशा चढून मग, तल्लीन झाली आपल्याच परी ।।
मध्यरात्र ती होवून गेली, चंद्र न दिसे अजूनी कुणा ।
वायु नव्हता फिरत नभी , मेघ राहती त्याच ठिकाणा ।।
दूध आटवूनी प्रसाद घेण्या, उत्सुक होतो आम्ही सारे ।
ढगात लपल्या चंद्राला मग, क्षीरात शोधी आमची नजरे ।।
स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते, शशिधरांच्या चांदण्यापरि ।
मेघांमध्ये तो लपला नसूनी, उतरलां होता याच क्षिरी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply