आपण दुधीचा हलवा बर्याचवेळा खाल्ला असेल. फारच मस्त असतो. पण कधी दुधीची खीर खाऊन बघितलेय? ही पण एक सुंदर आणि चविष्ट पाककृती आहे. चला बघूया कशी करायची ते..
साहित्य –
दुधी अर्धा किलो.
दूध पाव लिटर
साखर एक वाटी
तुप
वेलची
किसमीस
केशर
कृती –
प्रथम दुधी किसुन घेणे. नंतर गॅसवर भांडे तापत ठेवुन त्यामध्ये फोडणीसाठी थोडे साजुक तुप घालणे.
तुप तापल्यावर त्या मध्ये वेलची घालणे. वेलची तडतडल्यावर त्या मध्ये किसलेला दुधी घालणे व परतणे. दुधी थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये दुध घालुन उकळी आणणे.
नंतर त्यामध्ये केशर, किसमीस घालुन सजवणे. सजविण्यासाठी ड्रायफ्रूटचा वापर केला तीही उत्तम….
तयार झाली चविष्ट दुधीची खीर !!
— सौ अलका मुजुमदार
Leave a Reply