दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर ।
‘अहंब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।।
देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव ।
त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।।
आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा ।
ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।।
लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी ।
विसरून जातो सहजपणे, अंतर्मनातील देव कधी ।।
माझ्यातील देवही विसरणे, स्वभाव असेल जर माझा ।
कशी दिसेल दुजामधली, मग ती ईश्वरी ऊर्जा ।।
जाणून घे तू अस्तित्व त्याचे, सर्व जीवांच्या अंतर्यामी ।
म्हणशील त्याला ईश्वर तू , अन् ईश्वर आहे मी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply