दुःख दुःख ते काय?
सारथी जीवनाचा
भक्कम बुरुज हवा तेथे
आपुल्या मनाचा||
समर्थे चिंता बहोत
श्लोकरुपी बांधीले
उत्तर या दुःखाचे
आपल्या मनातले||
अर्थ–
सुखा मागूनी येते दुःख, दुःखा मागूनी सुख असं असतंच. आयुष्यात कोणत्याही प्रकारचे सुख आले तरी त्यात हुरळून जाऊ नका कारण ते सुख येतानाच आपल्या बरोबर दुःखाचा मार्ग घेऊन आलेले असते. पण मग इथे प्रश्न पडतो की अशाने माणसाने सुखाचा उपभोग घ्यायचाच नाही का? सुखाचे क्षण एन्जॉय करायचेच नाहीत का? चांगली गोष्ट घडली तरी आनंद मनवायचा नाही का? तर तसं नाहीये, सुखाचा भोग आणि दुःखाचा शोक हा करायलाच हवा कारण त्या क्षणांच्या पारड्यात बसून हलकावे खात केलेल्या प्रवासाला जीवन म्हणतात.
मग यावर उपाय काय? तर समर्थ म्हणतात की जर आपलं मन खंबीर असेल ना तर जगात कितीही दुःख, करूणता, द्वेष दाटून आला ना तरी मन डगमगत नाही. मग या मनाला खंबीर बनवण्यासाठी काय करायला हवे? तर त्याचे ही उत्तर समर्थांनी श्लोकांमधून आपल्या सर्वांसाठी देऊ केले आहे आणि ते म्हणजे मनाचे श्लोक. दुःख हे आयुष्याचा एक भागच आहे त्याला वगळून आयुष्य जगता येत नाही आणि म्हणून त्या दुःखाला मनाचे भक्कम बुरुज जोडले की आपोआप आपण त्यातही गनिमी कावा करून सुखाकडे आपलं आयुष्य जास्तीत जास्त प्रमाणात नेऊ शकतो म्हणून मनाचे श्लोक वाचावेत.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply