रंग बदलले ढंग बदलले,
साऱ्या जीवनाचे ।
बदलणाऱ्या परिस्थितीने,
तत्व शिकवले जगण्याचे ।।१।।
कैफ चढूनी झेपावलो,
नभात स्वच्छंदे ।
यश पायऱ्या चढत असतां,
नाचे मनीं आनंदे ।।२।।
धुंदीमध्यें असता एका,
अर्थ न कळला जीवनाचा ।
आले संकट दाखवूनी देई,
खरा हेतू जगण्याचा ।।३।।
दु:खामध्ये होरपळून जाता,
धावलो इतरांपाठीं ।
अनेक दु:खे दिसून येता,
झालो अतिशय कष्टी ।।४।।
दु:ख आपले निवारण्याते,
आनंद वाटे मनीं ।
इतर जणांची दु:खे हटविता,
द्विगुणीत झाला ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply