एका संडेच्या दिवशी केसांची हेअरस्टाईल व्यवस्थित केली आणि पिवळं पितांबर नेसून गाईचं गोमूत्र शिंपडत मुलींच्या कन्याशाळेकडे जाण्यासाठी उजवीकडे राईटला वळलो.
स्टार्टींगच्या सुरवातीलाच वाटलं थंड कोल्ड्रींक प्यावं तेवढीच गरम हीट कमी वाटेल. नंतर विचार केला त्यापेक्षा हायवे रोडवरच्या वटवृक्षाच्या झाडाखाली विश्रांती घेऊन रेस्ट घ्यावी पण नेमकं परत रिटर्न यायचं होतं. कंटाळून बोअर झालो आणि सरळ स्ट्रेट जाऊन गोल सर्कलपाशी सकाळच्या मॉर्निंग वॉकला विसरलेली पाण्याची वॉटर बँग मिळतेय का बघितलं पण माझा चुकीचा गैरसमज होता.
शेवटी साधा कॉमन सेन्स वापरला आणि शेवट मस्त एन्ड करण्यासाठी एक पेपर घेउन कागदावर सगळं रायटिंगमधे लिहून घेतलं. परत निघालो पुन्हा तर एका ओळखीच्याने स्वतःची आत्महत्या केल्याचं कळलं. आजूबाजूला लाल रक्ताचा टिपूसही नव्हता फक्त लाल कुंकू आणि खडूचे चॉकपीसेस पडलेले होते. एक एक जण उगीच नुसती गर्दीत भर घालत होता.
मी ओरडलो म्हटलं टाईम पाससाठी वेळ जात नसेल तर ताबडतोब बाहेर गेट औट व्हा!
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply