गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणपतीची पूजा दूर्वाच्या शिवाय होऊ शकत नाही असे मानले जाते.
गणपतीचे स्थान मूलाधार मानले जाते. मूलाधार चक्राशी निगडित अवयव म्हणजे पुरुषांचे प्रोस्टेट व व्रुषण ग्रंथी आणि स्रियांचे गर्भाशय व ओव्हरीज हे होत. जे देवाला प्रिय ते माणसाला उपयुक्त . गणपती प्रिय दूर्वा सेवन केल्याने स्रियांच्या ओव्हरीज वगर्भाशयातील व पुरुषांच्या प्रोस्टेटमधील हीट कमी होते. असा अनुभव आहे. त्यामुळे होणारे त्रास म्हणजे वय वाढल्यावर झोप न लागणे,पायाना सूज येणे, काही प्रमाणात पाय दुखणे, टाचा दुखणे वगैरे त्रास कमी होतात.
पाच दूर्वा रोज खाल्यातर फायदा होतो. हे शहरातील जीवन पध्दतीत शक्य होत नाही. त्यासाठी एकदा एक दूर्वांची जुडी आणून थोडेसेच पाणी घालून मिक्सरमधे चटणी करावी. फडक्यातून पिळून रस काढावा. हा रस नासू नये म्हणून त्यात दीड पट मध घालून ढवळून बाटली मधे भरून ठेवावे. दररोज ह्यतील पाव चमचा मध वाटी भर पाण्यात चांगला विरघळवून ते पाणी प्यावे. असे दिवस भरात दोन वेळा करावे. ह्या मुळे वरील त्रास कमी होतात. मी दूर्वाच्या टिंक्चरपासून साखर करून पेशंटना देऊन टाचा दुखणे, पायावरील सूज, वयस्कमंडळींची चिड चीड, झोप न लागणे हे आजार बरे केले आहेत.
अरविंद जोशी BSc.
9421948894
कृपया लेख फाँरवर्ड करताना त्यात कोणताही बदल करू नये.
Leave a Reply