नवीन लेखन...

दुसर्‍या महायुद्धातील ‘समज गैरसमज’

दुसर्‍या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार कारण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख.


‘युद्धस्य कथा रम्या’ असं म्हटलं जातं. युद्ध म्हणजे वैरभावाचा उद्रेक, शत्रुत्वाची परिसीमा. याचे परिणाम म्हणजे विध्वंस आणि हानी. एकाचा विजय व दुसर्‍याचा पराभव. काहींच्या जीवनाचा अंत तर जगणारांच्या वाट्याला हालअपेष्टा. तरी युद्धाच्या कथा रम्य वाटाव्यात? वाचकाला खिळवून ठेवणारी म्हणून रम्य? वाचकाला विचार करायला लावणारी म्हणून रम्य? युद्धनीती यशस्वी करणारी चाल कि डाव उलटविण्याची चतुराई? युद्धकथेत काय रम्य असते? युद्धातील क्रौर्य, हिंसा, नुकसान याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय युद्ध कथांना रम्य म्हणता येणार नाही. तसं केलं तर ती युद्धकथा राहणार नाही. रम्य असलेच तर त्या मागचे हेतू अणि उद्देश.

दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात जर्मनीने केली व युद्धाचा शेवट अमेरिकेने केला. हिटलरच्या महत्वाकांक्षेचे रूप बदलत गेले. पहिल्या महायुद्धाच्य अखेरीस झालेल्या व्हर्सायच्या कराराच्या जोखडातून मुक्तता, वर्णद्वेष इथून सुरुवात झाली. जर्मनीचा चॅन्सेलर, नाझी पक्षाचा प्रमुख व सैन्याचा सेनापती अशा तिहेरी भूमिका बजावणार्‍या हिटलरने युद्धाचे पाऊल उचलले. जर्मनीने 1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर आक्रमण करून युद्धाचे रणशिंग फुंकले. साम्राज्यविस्ताराची धाव युरोप व्यापून गेली. जर्मनीने रशियात मुसंडी मारली व ते अंगलट आले. हिटलरच्या पाडावाला सुरुवात झाली. हिटलरने 30 एप्रिल 1945 ला आत्महत्या केली व युरोपातील युद्धाची आग विझली. यापूर्वी 1941 मधे पर्ल हार्बरवर हल्ला करून जपानने अमेरिकेला युद्धात उतरण्यास भाग पाडले. तोपर्यंत अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. जुलै 1945 मधे युद्धबंदी करार झाले (Potsdam). पण जपानची युद्धाची खुमखुमी अजून संपलेली नव्हती.

दुसर्‍या महायुद्धातील दोन घटना मला अचंबित करणार्‍या वाटल्या. समज व गैरसमज यांची ही उदाहरणे वेगळा विचार करायला लावतात.

समज –

जर्मनीने युद्धाची व्याप्ती वेगाने वाढवली. ब्रिटनशी युद्ध सुरु केले. खाडी पलिकडे जर्मनीची विमाने जाऊन बॉंम्ब वर्षाव करू लागली. ब्रिटननेही जर्मनीत विमाने धाडत प्रत्युत्तर देणे सुरु केले. लंडन व बर्लीन या शहरांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही हवाई हल्ले होत होते. हे रोजचे झाले. कुणीही थांबत नव्हते. दोन्ही बाजूंची अपरिमित हानी होत होती. समाज घडी विस्कटली होती. लष्लरी तळ, युद्ध साहित्य बनविणारे उद्योग यांना लक्ष्य केलं जात होतं. त्याबरोबर निवासी भागही जाणीवपूर्वक उद्वस्त केले जात होते. असे असले तरी जर्मनी व ब्रिटन यांच्यात एक अलिखित समझौता झाल्याचे समजते. हिटलर व चर्चिल यांच्यात एका मुद्यावर एकवाक्यता दिसून येते. ‘जर्मनीने केंब्रिज व ऑक्स्फर्ड या विद्यापीठांवर बॉंम्ब हल्ले करायचे नाहीत आणि ब्रिटनने गॅटिंजन व हायडेलबर्ग विद्यापीठांवर बॉंम्ब हल्ले करायचे नाहीत’ असे ठरले. हा परस्पर संमतीने झालेला, कुठलीही नोंद नसलेला करार दोन्ही देशांकडून पाळला गेला. Everything is fair in love and war अशी उक्ती आहे. Attack on those 4 universities is not fair असा अपवाद जर्मनी व ब्रिटनने केला. लेखी करारांना केराची टोपली दाखवली जाते, तसे अलिखित कराराचे पालनही केले जाते. चांगला ‘समज’ कसा असू शकतो याचे हे उदाहरण.

गैरसमज –

जपान व अमेरिका यांच्यातील युद्ध पॅसिफिकमधे सुरु होते. ओकिनावा बेटावर ताबा मिळवताना अमेरिकेच्या नाकी नऊ आले होते. जपान सहजा सहजी शरण येत नाही हे अमेरिकेने अनुभवले. अमेरिकेला मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी सोसावी लागली. जुलै 1945 मधे युरोपातील महायुद्ध संपल्यावर पॉट्सडॅम करार झाला. त्यानुसार जपानने Unconditional Surrender ची अट पाळणे अपेक्षित होते. पण जपान काही अटी घालू पहात होता. हे अमेरिकेला मान्य नव्हते. ओकिनावाच्या अनुभवानंतर अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब चा वापर करण्याचे ठरविले होते. जपानच्या शरणगतीची अपेक्षा असताना अमेरिकेला एक संदेश प्राप्त झाला. जपानचे पंतप्रधान सुझुकी यांनी पाठविलेल्या संदेशात Mokusatsu हा शब्द होता. याचे दोन अर्थ होतात.

  • Take no notice of, Ignore
  • Treat with silent contempt, no comment

सुझुकी यांनी त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ स्पष्ट केला नाही. संदेशाच्या भाषांतरात दुर्लक्ष (Ignore) असा अर्थ लावला गेला. जपानची ही निर्ढावलेपणाची भूमिका अमेरिकेला अणुबॉम्बचा वापर करण्यास बळ देणारी ठरली. पहिला ‘Uranium 238 nuclear fission’ बॉम्ब हिरोशिमावर 6 ऑगस्ट 1945 ला टाकला गेला. प्रचंड विध्वंस झाल्यावरही जपानने दोन दिवसात ‘विनाअट शरणागतीचा’ प्रस्ताव मान्य केला नाही. अमेरिकेला नाइलाजाने ‘Plutonium implosion’ बॉम्ब नागासाकीवर टाकावा लागला. जपानचे डोळे उघडले. पंतप्रधान सुझुकी, सम्राट हिरोहिटो यांची गुर्मी उतरली. मग मात्र तातडीने जपानने शरणगती स्वीकारल्याचे जाहीर केले. सप्टेंबर 1945 मधे करार होऊन पॅसिफिक मधील युद्ध संपले. दुसर्‍या महायुद्धाची समाप्ती झाली. गैरसमजातून काय अनर्थ ओढवू शकतो हे यावरून लक्षात येते.

(दुसर्‍या महायुद्धावरील अनेक पुस्तकांच्या वाचना दरम्यान समज गैरसमज यांची ही उदाहरणे माझ्या स्मरणात राहिली. या घटना मी अगदी संक्षेपात मांडल्या आहेत. काही वेगळे समोर ठेवावे या हेतूने बॉंबची सर्वश्रृत नावे (Little boy, Fat man) न सांगता त्यांचे प्रकार सांगितले आहेत. युद्ध रम्य नक्कीच नाही, पण युद्धकथा काहीतरी विचार करण्यास वाव देतात ना? ‘दुसरे महायुद्ध’ या विषयावरील हा पहिला लेख.)

Avatar
About रविंद्रनाथ गांगल 37 Articles
गणित विषयात M.Sc. पदवी. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात (TCS) काम. निवृत्तीनंतर पुणे येथे वास्तव्य. वैचारिक लेख, अनुभवावर आधारित व्यक्तीचित्रे, माहितीपूर्ण लेख लिहिण्याची आवड आहे.Cosmology व Neurology चा अभ्यास. ब्रिज स्पर्धांमधे सहभाग.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..