आला म्हणती तो काळ
असा पडतो दुष्काळ ||धृ ||
नसते पिण्यास पाणी
नसते खाण्यास धान्य
नसते रानात पळपळ
नसते वनात सळसळ ||१||
मरती भूकेली गुरंढोरं
पडती आजारी पोरंसोरं
होई जीवांची तळमळ
रडते कडेवर ते बाळ ||२||
मोकळी झालेली गव्हाण
दु:ख धरतीचं आंदण
होई ओसाड तो माळ
राती भेटेना सकाळ ||३||
कुठे घडतेय माळीण
कुठे गुडूप किल्लारी
कुठे तहानेने व्याकूळ
होई उध्वस्थ गोकूळ ||४||
असं माणसाचं जिण
जरा रहावेस जपून
माणसातील माणसा
कर पशूपक्षी सांभाळ ||५||
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार, जि. बीड
मो. ९४२१४४२९९५
Leave a Reply