द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक, —
देहातून आत्मा सुटावा.
घे स्वैर भरारी,
माझ्या देखण्या पाखरा,—
बद्ध पंख हे उचंबळती,
सोडून ही बंदिस्त कारां,—
पिंजर्याचे दार लागतां,
जीव तुझा घुसमटे,
स्वातंत्र्याच्या फोल कल्पना,
सर्वच विचारा खींळ लागे
आतल्या आत जीव तडफडे, सीमित जागा, नुसताच हिंडे
डोळे भिरभिरत कसा शोधशी,
तू आपला मुक्तपणा, –!!!
जो येईल तो बोलू बघे,
इथेतिथे उगा हात लावे,–
कठोर काळीज करुन आपुले, मानव कधी छेड’ही काढे,-!
नको नको परतंत्रता,
पटकन आता झेपाव गगनी, मिसळ जाऊन भाईबंदा,
स्वातंत्र्याने होशील आनंदी,
झाडा झाडांवर कर आपला,
अगदी स्वच्छंद विहार,
गोड गोड फळे चाखावया,
कशाला रे उशीर फार ,–?
या कारे’त काय ठेवले,
बेचैनी, उलघाल, अस्वस्थता, ताणतणाव विसरून साऱ्या,
पर” पसरून कर गोड सांगता,-!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply