महाद्रिपार्श्चे च तट रमन्तं
सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रै: ।
सुरासुरैर्यक्षमहोरगाद्यै:
केदारमीशं शिवमेकमीडे ।।११।।
पृथ्वीवरील स्वर्ग स्वरूपात ज्या हिमालयीन पर्वतरांगांचे वर्णन केले जाते त्या शब्दातीत सौंदर्यशाली प्रांतात असणारे अद्वितीय शिवस्थान म्हणजे श्री केदारनाथ.
एका बाजूला केदार दुसऱ्या बाजूला खर्च कुंड तर तिसर्या बाजूला भरत कुंड आता तीन पर्वतांच्या संरक्षणात असणारे हे अद्वितीय स्थान.
मंदाकिनी, मधुगंधा, क्षीरगंगा, सरस्वती आणि स्वर्णगौरी असे पाच जलप्रवाह कधीकाळी येथे प्रवाहित होते.
भगवान श्रीविष्णु चे स्वरूप असणाऱ्या नर आणि नारायण नामक महर्षींचे हे तपस्या स्थान. त्यांना दर्शन देण्यासाठी भगवान केदारनाथ स्वरूपात येथे प्रकट झाले.
२०१३ च्या महाभीषण प्रलयात देखील दिमाखात उभे असणारे हे मंदिर सर्वप्रथम पांडवांनी उभारले असे वर्णन आहे. त्यानंतर भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य स्वामींनी यांचा जीर्णोद्धार केला.
अक्षय तृतीया ते कार्तिकी पौर्णिमा याच काळात दर्शनासाठी मुक्त असणाऱ्या इतर वेळी बर्फाच्छादित असणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण स्थळाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
महाद्रिपार्श्चे च तट रमन्तं – विश्वातील सगळ्यात मोठा पर्वत म्हणजे हिमालयाच्या तटावर असणारे,
सम्पूज्यमानं सततं मुनीन्द्रै: – नरनारायणां सह सकल ऋषी मुनींकडून सतत पूजिल्या जाणारे,
सुरासुरैर्यक्षमहोरगाद्यै: – सुर म्हणजे देवता, असुर म्हणजे राक्षस, यक्ष आणि महा उरग म्हणजे नाग यांच्याद्वारे पूजिल्या जाणाऱ्या,
केदारमीशं शिवमेकमीडे – भगवान श्री केदारनाथ शंकरांची मी उपासना करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply