MENU
नवीन लेखन...

प्रत्येक जोडप्याने एकदा जरुर वाचा. खूप गैरसमज दूर होतील !

गिरिजा व प्रसाद मुंबईला सकाळी एक्‍स्प्रेसने निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी घरी न्याहारी केली. गिरिजा ही पित्तप्रधान व प्रसाद हा कफप्रधान प्रकृतीचा होता. पित्तप्रधान प्रकृतीमुळे गिरिजाचा जठराग्नी प्रदीप्त होता. दोन तासांतच तिला भूक लागली. कर्जतला गिरिजाने वडापाव मागितला. प्रसादला भूक नसल्याने त्याने गिरिजाला वडापाव घेऊन दिला. नंतर दादरजवळ गिरिजाने सॅंडविच खाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसाद म्हणाला, ‘‘आपण सकाळी बरोबरच न्याहारी केली. तू नंतर वडापाव खाल्लास. आता परत सॅंडवीच मागतेस. तोंडावर जरा बंधन घाल.’’ आपल्या खाण्यावर टीका केल्याने गिरिजाला राग आला व वाद होऊन दिवस खराब गेला. प्रसादला हे कळलं असतं, की पित्तप्रधान प्रकृतीच्या लोकांचं अन्नपचन लवकर होतं, त्यांना वारंवार भूक लागते; तर वाद झाला नसता.

सचिन व हेमा प्रेमळ जोडपं. सचिन वातप्रधान; तर हेमा कफप्रधान प्रकृतीची. कफप्रधान प्रकृतीचे लोक स्थूल असून, ते डुलत-डुलत चालतात. वातप्रधान प्रकृतीचे लोक वेगाने चालतात. सचिन हेमाच्या बरोबर चालताना भरकन पुढे जायचा, त्यामुळे ‘मी तुम्हाला शोभत नाही म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चालत नाही,’ असा गैरसमज करून हेमा वाद घालायची. वातप्रकृतीचे लोक जलद चालतात हे हेमाला ठाऊक असते, तर त्यांची भांडणे टळली असती.

स्त्रिया संपूर्ण दिवसात देहबोली व हावभाव धरून सुमारे २० हजार शब्द बोलतात; तर पुरुष सात हजार शब्द बोलतो. पुरुष दिवसभर घराबाहेर सात हजार शब्दांचा साठा संपवून घरी येतो. स्त्री दिवसभर घरीच असेल, तर तिचा शब्दसाठा शिल्लक असतो. शब्दसाठा संपल्यामुळे पतीची बोलायची इच्छा नसते. पत्नीला मात्र किती बोलू असं होतं. नवरा ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यास त्याचं आपल्यावर प्रेमच नाही, असं तिला वाटतं व वातावरण बिघडायला सुरुवात होते. पुरुषाचा नैसर्गिक शब्दसाठा सात हजारच असतो, हे पत्नीला माहीत असतं, तर भांडण टळलं असतं. मागच्या पिढीपुढे ही समस्या नसायची. एकत्र कुटुंबात खूप माणसं, त्यामुळे स्त्रीचा २० हजार शब्दांचा साठा पुरा व्हायचा; पण आता मोबाईलवर बोलूनही व नवऱ्यानं प्रतिसाद न दिल्यानं तिचा हा शब्दांचा साठा पूर्ण होत नाही. ती निराश होते व बोलण्याची स्वाभाविक इच्छा पूर्ण न झाल्यानं संबंध बिनसतात.

पती-पत्नी एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादतात आणि आपल्या आवडीनिवडी, सवयी सारख्या असाव्यात, असा आग्रह धरतात. पण आपल्या साथीदाराला निसर्गनियमाला अनुसरून ‘स्पेस’ व स्वातंत्र्य द्यायला हवं. एकमेकांना समजून घ्यायला हवं. अहंकाराला तिलांजली देऊन जुळवून घेण्याची मानसिकता ठेवली, तर जीवनवेलीवरच्या फुलांना बहर येईल.

विचार करा!

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

1 Comment on प्रत्येक जोडप्याने एकदा जरुर वाचा. खूप गैरसमज दूर होतील !

  1. नमस्कार,
    सुंदर माहितीपूर्ण लेख.
    – ज्याप्रमाणें ‘You just don’t understand’ , ‘Women are from Venus, Men are from Mars’ ही पुस्तकें स्त्री-पुरुषांच्या वर्तनातली भिन्नता दाखवून देतात, तसेंच तुम्ही effectively साधलें आहे. खरोखरच, प्रत्येक जोडप्यानें ध्यानात घ्याव्या व लक्षात ठेवाव्या असा या बाबी आहेत.
    सस्नेह
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..