पूर्व पाकिस्तानचे राजकारणी शेख मुजिबुर रहमान व बांगलादेशच्या निर्मितीस कारणीभूत असलेल्या नेत्यांपैकी एक शेख मुजिबुर रहमान यांचा जन्म १७ मार्च १९२० रोजी झाला.
मुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही. भारताचे सैन्य पाहिजे तेव्हाच गेले आणि काम झाल्यावर लगेच बाहेर पडले. नऊ महिन्यांच्या मुक्तिसंग्रामात अनेक पाकिस्तानी सनिकांनी अनेक बंगाली स्त्रियांवर बलात्कार केले. त्यांनी ते पद्धतशीरपणे केले. १० जानेवारी १९७१ ला मुजिबुर रहमान हे पाकिस्तानी कैदेतून मुक्त होऊन स्वतंत्र बांगलादेशास परतला. त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. देश उभारणीसाठी त्यांनी सोविएत पद्धतीची अर्थनीती स्वीकारून राष्ट्रीयीकरण सुरू केले. तागाची निर्यात क्युबाला केली त्याबरोबर अमेरिकेकडून येणारी अन्नधान्य मदत बंद झाली. नित्य लागणाऱ्या वस्तूंचा बाजारात तुडवडा भासू लागला. पण त्यानेच स्थापन केलेल्या ‘जातीय राखी वाहिनी’च्या कार्यकर्त्यांना त्या काळ्या बाजारात मिळू लागल्या. त्याच्या अवामी लीगचे नेते तस्करी, चोरटय़ा व्यापारात गुंतले होते. मुजिबुर रहमान यांची विश्वासार्हता झपाटय़ाने कमी होऊ लागली. स्वतंत्र बांगलादेशापेक्षा पाकिस्तानच बरे होते असे लोकांना वाटू लागले. त्यात भर म्हणून त्याने सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी घालून फक्त त्याच्याच एका पक्षाला मान्यता दिली. ‘एक नेता एक देश, शेख मुजिब बांगलादेश’ ही घोषणा सुरू केली. मुक्तीनंतर २-३ वर्षांतच बांगलादेश एक टिनपाट हुकूमशाही दिसू लागली. या परिस्थितीमध्ये सन्यातल्या मेजर फारुख रहमान आणि इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांनी कट रचला. इंदिरा गांधींनी त्याची गुप्त माहिती मुजिबुर रहमान यांना पुरवली होती.
१५ ऑगस्ट १९७५ च्या पहाटे मुजिबसकट सर्व कुटुंबीयांचा, पत्नी, मुलगी, १० वर्षांचा मुलगा, जावयासह सर्वाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. संशयाची बाब ही की, दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने ५० हजार टन तांदळाची मदत जाहीर केली. नंतर आलेल्या खोंडकरने मारेकऱ्यांना ‘शुजरे संतान’ म्हणजे ‘सूर्यपुत्र’ असे गौरवले. पुढील एक-दोन वर्षांत बरीच उलथापालथ, अनेक राजकारण्यांची हत्या होऊन लेफ्ट. जन. झिया उर रहमान हुकूमशहा झाले.
त्यांनी १९८१ साली मुजिबुर रहमान यांची मुलगी शेख हसीनाला पुन्हा मायदेशी येण्याची परवानगी दिली. नंतर शेख हसीना वाजेद या बांगलादेशच्या पंतप्रधानपदी होत्या.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply