नवीन लेखन...

इको-फ्रेंडली गणपतीबाप्पा बनविण्याची पद्धत

वर्तमानपत्र आपल्या प्रत्येकाकडे दररोज येते, परंतु ते वाचले की काम झाले मग ते कसेही एकावरएक ठेऊन उंची वाढली की त्याला रद्दीचे रूप येते. अश्या रद्दीचे करायचे काय ? विकता तर येतेच पण अजून आपण त्यापासून काय करू शकतो ? असा प्रश्न सर्वांपुढे असतो.

“जुने ते सोने” या उक्तीतून आपल्याला आज काही नवीन कल्पना समजून घेणे जरुरी आहे. रद्दीचा चांगला उपयोग करता येतो हेही आपल्याला कळेल. पुढील महिन्याच्या ७ तारखेला म्हणजे (७ फेब्रुवारी, २०११) श्री.गणेशजयंती आहे, त्याला माघी गणेश चतुर्थी म्हणतात. जसे भाद्रपदात गणपती उत्सव साजरा करतात तसाच माघ महिन्यातही काही ठिकाणी माघी गणपती उत्सव साजरा करण्याची पद्धत आहे हे सर्वांना माहित आहे. यंदा माघी गणेशउत्सव ईको-फ्रेंडली करण्याचा काहींचा बेत असेल तर त्या तरुणानी/मंडळांनी या नवीन संकल्पनेचा संकल्प सोडवा.

साहित्य : मिक्सर किंवा पाटावरवंटा किंवा ग्राइनडर. कागदाचा लगदा, डिंक, व्हाईटिंग पावडर, गणपतीचा साचा, तेल किंवा शंखजिरे पावडर, पोळपाट लाटणे, नटबोल्ट व पान्हा.

कृती : इको-फ्रेंडली श्री.गणेश बनविताना प्रथम वर्तमानपत्राचे बारीक बारीक तुकडे करा. कारण वर्तमानपत्रात छापण्यासाठी वापरलेली इंक (शाई) विविध रसायनांनी बनलेली असते, तसेच कागद बनविण्यासाठी बर्याच रसायनांचा उपयोग केलेला असतो व ती रसायने काढून टाकण्यासाठी वर्तमान पत्राचे केलेले तुकडे एका पाण्याने बहरलेल्या बादलीत/पिंपात तीन दिवस भिजत ठेवायचे आहेत. प्रत्यके दिवशी सकाळी त्यातील पाणी काढून टाकायचे व दुसरे पाणी घालून परत भिजत ठेवायचे. असे तीन दिवस केले की तिसर्या दिवशी तो लगदा कापडात चांगला पिळून त्यातील सर्व पाणी काढून टाकायचे. हे का केले ते आता कळलेच असेल. ( तीन दिवस काढून टाकलेल्या पाण्यातून शाई (इंक) व रसायने त्या कागदाच्या

लागद्यातून निघून जाण्यास मदत होते).

कागदाचे तुकडे तिसर्या दिवशी पाण्यातून काढले की ते मिक्सर किंवा ग्राइनडर मध्ये टाकून चांगले एकजीव करा आणि तो लगदा चांगला पिळुन उन लागणार नाही अश्या जागी वाळवायचा. सुखल्यानंतर त्याचे कुर्मुर्यासारखे किंवा गवल्या सारखे तुकडे करायचे. आता हे सर्व भिजविण्यासाठी बाजारात मिळणारा गम म्हणजे डींक दोनदिवस चांगला पाण्यात भिजत ठेवायचा. दोन दिवसानंतर ते द्रावण चांगले चौपदरी कपड्यातून गाळून घ्यायचे. कागदाच्या लगद्या पासून बनविलेल्या कुर्मुर्यात आधी बनविलेले डिंकाचे द्रावण थोडे थोडे त्यात मिसळायचे जेणे करून पोळी करिताना कणिक भिजवितात तशी चुमुरे द्रावणाच्या साह्याने खूप चांगले मळायचे त्यात व्हाईटिंग पावडर(whiting chalk Powder) थोडी थोडी घालत रहायची जेणे करून पोळी बनविण्यासाठी कणिक होते तशी झाली कि त्याच्या पोळ्या लाटायच्या व त्या पोळ्या एक एक करून आपल्याकडे आधीच आणलेल्या साच्या भरायच्या. पोळी भरण्या आगोदर साच्याला आतून तेल किंवा शंखजिर्याची पावडर लावायची जेणे करून साच्यात भरलेल्या सुखल्या नंतर पोळ्या साच्याला चिकटणार नाहीत. प्रत्येक सांध्यावर कागदाच्या लगद्याच्या लांब लांब वळ्या चांगल्या जोराने चिकटवा. आता त्यावर छोटे छोटे, वर्तमान पत्राचे तुकडे गमने सांध्याच्या व साच्याच्या आतील भागाला चिकटवा जेणे करून आतमध्ये भेगा पडणार नाहीत. सर्व साचा नटबोल्टने पुन्हा होता तसा जोडून उन्हात वाळवा. दुसर्यादिवशी साचा सोडा. झाला इको-फ्रेंडली गणपतीबाप्पा तयार. नंतर फिनिशिंग करून रंगवा. अश्या तरेहेने आपण अजून बर्याच गोष्टी बनवू शकतो, जसे लहान मुलांची खेळणी, मराठी/इंग्रजी मुळाक्षर इत्यादी.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..