नवीन लेखन...

इकोफ्रेंडली गणेशमूर्तीकार प्रमोद पालव



गणराय ही विद्येची देवता. कोकणातील गणेशोत्सव जगप्रसिध्द आहे. या उत्सवाची लगबग आता प्रत्येक घरादारात सुरु आहे. दिवसरात्र कलाकारांची गजबज सुरु आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत जाईल तसतशी कलाकारांची गजबज अविश्रांत वाढत जाईल. नैसर्गिक साहित्याचा

पुरेपूर वापर करत इकोफ्रेंडली अशी गणेशमूर्ती तयार करुन हलक्या आणि मजबूत मूर्तीचा एक आदर्श सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील कलाकार प्रमोद पालव यांनी सर्वांच्या समोर ठेवलाय. शाडूची माती, झाडांचा रस, कागद, डिंक आणि नैसर्गिक रंग, दगड यापासून करण्यात येणारी चमकी यांचा वापर करून तो गणराया साकारतो. या मूर्तींमुळे प्रदूषणाचा प्रश्न सुटला असल्याने कलाकार प्रमोद पालव यांच्या संशोधनाचा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गौरव केला असून अशा हलक्या आणि इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचे पेटंट पालव यांना बहाल करण्यात आले आहे. वडिलांकडून शिल्पकलेचा वारसा घेतलेल्या पालव बधूंनी सिंधुदुर्गात एक आदर्श उपक्रम सुरु केला आहे. प्रमोद पालव यांनी शिल्पकलेत संशोधन करत गणेशमूर्ती अधिकाधिक हलकी आणि मजबूत करण्यात यश मिळविले. कला सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या त्यांच्या शिल्पांना देशभरात मागणी आहे. अशाच मूर्ती सर्वत्र बनविल्या जाव्या यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रमोद पालव यांच्या कार्यशाळा राज्यभर आयोजित केल्या आहेत. इकोफ्रेंडली गणेश म्हणजे पालव बंधू असं समीकरणच झालं आहे.या मूर्तीकलेत आणखी संशोधन करत पालवे बंधूंनी झाडाचा रस, कागद, डिंक आणि शाडू मातीच्या मिश्रणातून अनोखे रसायन निर्माण करुन हलक्या गणेशमूर्तीची निर्मिती केली आहे. जे. जे. आर्टमधून पदवी घेतलेले प्रमोद पालव सध्या भालचंद्रनगरी कणकवलीत वास्तव्याला आहेत. जांभवडे गावचे हे पालव बंधू गावातही अशाच मूर्ती
नवितात. नैसर्गिक साहित्याचा मूर्ती कलेत कसा वापर केला जाईल आणि जास्तीत जास्त इकोफ्रेंडली मूर्ती कशी बनेल याकडेच त्यांचा कल असतो.कागदाचा लगदा तयार करुन त्यात शाडू माती आणि उंबर, बाभळ या झाडांचा

रस काढून या मिश्रणातून गणेशमूर्ती आकाराला येते. या मूर्ती कडक आणि हलक्याही असतात. विर्सजनासाठी या मूर्ती पाण्यात सोडल्या की, काही मिनिटातच त्या विरघळू लागतात. कागदाच्या लगद्यामुळे विर्सजनानंतर तात्काळ पाण्याचा तळ गाठतात. प्लॅस्टरच्या मूर्तीपेक्षा ५० टक्के हलक्या असणार्‍या या मूर्तीच्या रंगकामाबद्दल माहिती देतांना पालव म्हणाले की, बाजारात मिळणार्‍या रंगांपेक्षा व्यक्तीश: तयार केलेले निसर्गरंग उत्कृष्ट असतात याची आम्हाला लहाणपणापासूनच जाणीव झाली होती. काही ठराविक रंग वगळता अन्य रंग आम्ही झाडपाला, माती आणि दगडापासून बनवितो. पालव यांच्या मूर्तीशाळेत गेल्यावर याचे दर्शन घडते. एका बाजूला भेंडय़ांच्या बोळातून रस काढला जात होता तर दुसरीकडे कुपीत्रीसारख्या दगडातून अभ्रकाचा किस काढला जात होता. हा किस वस्त्रगाळ करुन मूर्तीसाठी चमकी तयार करण्यात येते अशी माहिती पालव यांनी दिली. नदीतील लव्हाळ्यांचा काडय़ांचा वापर ते रंग कामासाठी करतात. सध्या पालव यांच्या मूर्तीशाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. तीन महिने अगोदर आपण ऑर्डर स्विकारतो असे सांगतांना राज्य सरकारकडून १ लाख गणेशमूर्तींची ऑर्डर मिळाल्याचे पालव यांनी अभिमानाने सांगितले. मूर्तीकाम करण्यासाठी कारागिरांनी पुढे यावे. स्वस्त आणि सुंदर मूर्ती या निसर्गाच्या कौशल्यातून करता येऊ शकते. बचतगटाच्या माध्यमातून मूर्तीशाळांचा विस्तार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. कित्येक फूट उंचीच्या मूर्ती तयार करताना पारंपरिक कारागिर मूर्तीच्
या बाजूने काठय़ा बांधून मूर्तीचे काम करतात. मात्र कागदी लगद्यापासून बनविण्यात येणारी मूर्ती काही तासातच कडक होत असल्याने पालव हे मूर्तीकाम करतांना मूर्तीला शिडी लावून उर्वरित काम करतात. प्रमोद पालव यांनी केलेली कोकणातील धनगराची मूर्ती दिल्लीच्या प्रदर्शनात दाखल झाली आहे. पालव महाराष्ट्रात भ्रमंती करताना त्यांच्या पत्नी, मुलगी आणि इतर कलावंत मूर्तीशाळेचे काम पहात आहेत. पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या प्रसार करत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची भेट पालव यांच्याशी झाली आणि महाराष्ट्राला इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची ओळख व्हायला सुरुवात झाली. आता तर राज्यातील शिल्पकलांना धडे देण्यास सुरुवात केली आहे, हे सिंधुदुर्गवासियांसाठी अभिमानास्पद आणि आदर्शवत आहे असेच म्हणावेसे वाटते.

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..