शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्याच शेतकर्यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते. चौकशी केली तर आमची शेळी आपली साधी गावरान शेळी आहे, असे मोघम उत्तर दिले जाते. शेळींच्या जातींचा आणि प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळी पालन कधीही यशस्वी आणि ङ्गायदेशीर होणार नाही. चार-पाच किंवा ङ्गार तर दहा-बारा शेळ्या पाळणार्यांना ङ्गायद्या-तोट्याचा विचार ङ्गारसा करावा लागत नाही. कारण त्यांच्या शेळ्या बिनखर्ची पाळल्या जात असतात. काही शेतमजूर आपल्या सोबत चार-दोन शेळ्या घेऊन कामावर जातात. त्या शेळ्या दिवसभर इकडे तिकडे चरतात. त्यामुळे त्यांच्या चार्यावर वेगळा खर्चच करावा लागत नाही. त्यामुळे जे काही उत्पन्न मिळते तो ङ्गायदाच असतो. अशा लोकांना शेळ्यांची प्रजनन क्षमता, त्यांच्या क्षमतेत होणारी वाढ वगैरे मुद्यांचा विचार करण्याची गरजच पडत नाही. परंतु अशा चार-दोन किंवा दहा-बारा शेळ्या पाळणारे लोक आपल्या शेळ्यांना किती पिली होत आहेत आणि किती व्हायला पाहिजेत याचा कधी विचारच करत नाहीत. मग हळु हळु त्यांच्या शेळ्यांना होणार्या पाटींना एकेकच पिलू व्हायला लागते. त्याचे वजनही म्हणावे तसे भरत नाही.
हा सगळा त्या शेळीच्या वंशाचा होणारा र्हास असतो. त्याचे कारण काय ? थोडे समजून घेतले पाहिजे. आपल्या शेळ्यांच्या छोट्याशा खांडामध्ये सात-आठ शेळ्या आणि दोन-तीन बोकड असतात. त्या शेळ्यांच्या पोटी बोकड जन्माला आले की, आपण जुनी बोकडे विकून टाकतो आणि पुढे आपल्याकडे असलेले बोकड मोठे झाले की, त्यांचा त्याच खांडातल्या शेळ्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या शेळ्या यांच्याशी संबंध येतो. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते बोकड त्या शेळीचे मूल आहे आणि त्यातल्या काही शेळ्यांचा भाऊ आहे. शरीर संबंधाच्या बाबतीत माणूस जसा विचार करतो तसा शेळ्या करत नाहीत. परंतु आपण त्यांच्या बाबतीत तसा विचार केला पाहिजे आणि आपल्याच खांडातल्या बोकडांचा आपल्याच खांडातल्या शेळ्यांशी म्हणजे एकाच कुटुंबातल्या शेळ्यांशी संबंध येऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. तशी न घेतल्यामुळे त्या शेळ्यांचा वंश दर्जेदार होत नाही. पुढे पुढे त्यांची क्षमता कमी कमी होते. यावर उपाय काय ? आपल्याच गावामध्ये आपल्यासारखे कोणी शेळीपालक असतील तर त्यांच्याशी चर्चा करून त्यांना हे शास्त्र पटवून दिले पाहिजे आणि बोकडांची आपापसात अदलाबदल केली पाहिजे. तर शेळी पालन ङ्गायदेशीर ठरू शकते.
महाराष्ट्रात सध्या मटणासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळींची पैदास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे डॉ. वसंतराव मुंडे, उस्मानाबाद (ङ्गोन ९४२२५६५३६५) हे नेहमी शेळ्या पाळणार्यांना एक आव्हान देत असतात. ‘२५ शेळ्या पाळा आणि मारुती कार पळवा’ अशी त्यांची घोषणा आहे. मात्र या २५ शेळ्या अभ्यासपूर्ण रितीने पाळल्या पाहिजेत, असा त्यांचा कटाक्ष आहे. आपण आता केलेला बोकडांच्या अदलाबदलीचा विचार याच दृष्टीने महत्वाचा आहे. शेळी पालनाच्या शास्त्राची माहिती असणे हा व्यवसाय ङ्गायद्यात चालण्यासाठी आवश्यक असते. कारण शेळी हा सजीव प्राणी आहे. अनमानधपक्याने किंवा अंदाजपंचे हा व्यवसाय केला तर तो कसाबसा चालू शकेल. पण त्यात ङ्गारसा ङ्गायदा होणार नाही. तो शास्त्रीय पद्धतीने केला तर मात्र तो शेतकर्यांच्या जीवनाचा मोठा आधार बनू शकतो. काही शेतकरी अक्कलहुशारीने हा व्यवसाय करत असतात. काही लोकांनी या संबंधात माहिती दिलेली आहे. मुस्लीम समाजाच्या बकरी ईद या सणामध्ये प्रत्येक कुटुंबात एक तरी बळी देवाला दिला जात असतो. तो साधारणत: बकर्याचा असतो. त्यामुळे बकरी ईद दिवशी बोकडांची मोठी टंचाई जाणवत असते. अक्षरश: बोकडासाठी तू मी तू मी सुरू असते आणि या चढाओढीमध्ये बकर्याला जास्त पैसे मिळतात.
त्याचा ङ्गायदा घेऊन काही शेळी पालक शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकड विकतात आणि काही बोकड केवळ बकरी ईद साठी राखून ठेवतात. अगदी ग्रामीण भागात सुद्धा या बोकडांना त्या दिवशी प्रचंड मागणी असते. वेळ प्रसंगी चार पैसे जास्त देऊन बोकूड खरेदी करण्याची मुस्लीम भाविकांची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकूल मागे-पुढे पहात नाहीत. ती शेतकर्यांसाठी पर्वणीच असते. याचा विचार करून काही हुशार शेतकरी केवळ बकरी ईद साठी म्हणून खास बोकड सांभाळतात. विशेष करून मुंबईमध्ये त्या दिवशी बोकडांना ङ्गारच पैसे मिळतात. कित्येक शेतकर्यांच्या बोकडांना मुंबईत वीस ते चाळीस हजार रुपयांपर्यंत किंमत आलेली आहे. एरवी हेच बोकड गावच्या आठवड्याच्या बाजारात पाच-सहा हजाराला सुद्धा जात नाही. विशेषत: बोकूड जन्माला आल्यानंतर त्याच्या कपाळावर चंद्राच्या आकाराचा किंवा चंद्राच्या कोरीच्या आकाराचा पांढरा ठिपका असेल तर अशा बोकडाच्या मालकाचे उखळ पांढरे झालेच समजा. दर बकरी ईद सणाला असे पांढरे ठिपके असलेले बकरे केवढ्याला विकली जात असते याची चर्चा होत असते आणि दर वर्षी अशा बोकडाच्या किंमतीनी खळबळ निर्माण केलेली आपल्याला दिसते.
या वर्षी तर असे पांढरे ठिपकेवाली बोकडे लाखाच्या पुढे आणि दीड-दीड लाखापर्यंत गेलेली आहेत. तेव्हा शेळी पालकांनी जमेल तशी बकरी बकरी ईदसाठी राखून ठेवली पाहिजेत आणि पांढरा चॉंदवाला बोकड तर जीवापाड जपून त्याला मुंबईला नेऊन विकले पाहिजे. सोलापूर, नगर या भागामध्ये काही शेळी पालक हा व्यवसाय करतात आणि टेंपो भरून बकरे बकरी ईदला मुंबईत घेऊन जातात. हा एक अभ्यासाचा आणि निरीक्षणाचा मुद्दा आहे. शेळी पाळणार्या शेतकर्यांना दरवर्षीच बकरी ईदच्या बोकडांच्या किंमतीची चर्चा ऐकायला मिळत असते. परंतु ती ऐकून त्यापासून ते काही बोध घेत नाहीत. तसा तो घेतला पाहिजे आणि व्यापारी बुद्धीचा वापर करून चार पैसे जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच तर अभ्यास आहे.
Leave a Reply