कणकण भारत कोसळताना पाहुन अंतरी कळवळला।
कौटिल्याचा ज्ञानदिप तो मार्ग दावितो आम्हाला॥धृ॥
सिमेवरती उभा सिकंदर फिकीर तयाची कोणाला ।
धनानंद हा तुकडे फेकुन जमवीत बसला श्वानांना।
नंदकुळाचा नाश करीन मी भिष्म शब्द तो धगधगला।।१।।
जिंकाया जग इर्षा धरुनी समरांगणी तो तळपतसे।
सिंकदराला विश्वविजेता कोण मूढ तो म्हणवितसे।
गर्व तयाचा चाणक्याने सिमेवरती उतरविला।।२।।
राजनितीचे सुत्र नवे मग विश्वपटावर मांडियले
अखंड भारत पाहीन डोळा शब्द कृतीतुन अवतरले।
सेल्युकस मग सिमेवरती काही मिनिटांत लोळविला॥३॥
कसे नियंत्रित राखावे या राष्ट्राला मग एकवटुन।
सुत्रबध्द ते केले सारे ज्ञान आपुले ग्रंथातुन।
अलौकिक तो अजुनी आहे ग्रंथ जगातील ठरलेला॥४॥
– रणजित हिर्लेकर
Leave a Reply