नवीन लेखन...

मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकांचे संपादक पु. वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे

मेनका, माहेर आणि जत्रा या मराठी मासिकांचे संपादक पु. वि. बेहेरे ऊर्फ राजाभाऊ बेहेरे यांचा जन्म ११ जून १९३१ रोजी झाला.

नियमित उत्पन्नाची सरकारी नोकरी सोडून राजाभाऊ बेहेरे यांनी जेव्हा मराठी नियतकालिक काढायचे ठरविले, तेव्हा विलक्षण जिद्द आणि आपल्याला नेमके काय करावयाचे आहे याचे अचूक भान याच्याखेरीज त्यांच्याकडे काहीही नव्हते. मात्र मासिक काढायच्या कामात त्यांना त्यांच्या पत्नी सुमनताई बेहेरे यांनी मोलाची साथ दिली.

१९५९ साली मुंबईहून प्रकाशित झालेल्या ‘मेनका’च्या पहिल्याच अंकावर आचार्य अत्रे यांनी टीका केली. नावावरून त्यांना हे मासिक मराठीमध्ये काहीतरी भयंकर करणार असे वाटले. पुण्याच्या अश्लील मार्तंड कृष्णराव मराठे यांनीही खटला भरला. त्याचा भरपूर मनस्ताप बेहेरे दांपत्याला सोसावा लागला. पण त्या खटल्यामुळे मेनका मासिकाची बरीच चर्चा होऊ लागली आणि त्यामुळे चांगलीच प्रसिद्धीही झाली. पहिल्या अंकापासूनच वाचकांनी मासिकाला हात दिला आणि त्यानंतर मात्र मेनका मासिक ५०हून अधिक वर्षे चालतच राहिले.

मेनका प्रकाशित व्हायला लागल्यानंतर ४ वर्षानी राजाभाऊ बेहेरे पुण्याला गेले आणि मग मेनकाच्या जोडीनेच १९६३ साला पासून माहेर आणि १९६५ साला पासून जत्रा ही नियतकालिके ते प्रसिद्ध करू लागले. पु. भा. भावे, ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ, श्री. ज. जोशी, वसुंधरा पटवर्धन, ज्योत्स्ना देवधर अशा अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. बघता बघता या तीनही नियतकालिकांचा जम बसला.मासिकांकरिता लिहिणाऱ्या लेखकांची भक्कम फळी असली तरी त्याला बेहेऱ्याच्या कल्पकतेची जोड मिळत गेली. तर एकाच कादंबरीची प्रकरणे विविध लेखकांकडून लिहून घ्यायची ही कल्पना वाचकांना फार आवडली. तसेच लेखकांकडून लिहून घेतलेल्या काही कथा प्रसिद्ध करताना त्याखाली चार-पाच लेखक-लेखिकांची नावे देऊन ही कथा यापैकी कोणी लिहिली ती वाचकांनी ओळखावे असे आवाहन केले जाई. त्यामुळे मासिकांना रसिक वाचकांचा सहभाग मिळत गेला. नियतकालिकांखेरीज पु.वि. बेहेरे यांनी मेनका प्रकाशन नावाची संस्था काढाली. या संस्थेमार्फत त्यांनी पुस्तक प्रकाशनाचा व्यवसायही सुरू केला.

मराठी लेखक व.पु. काळे, मालती कारवारकर, प्रवीण दवणे, मंगला गोडबोले यांची अनेक पुस्तके ’मेनका’ने प्रकाशित केली.

पु.वि. बेहेरे यांचे २७ जानेवारी २००० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..