नवीन लेखन...

एक आई

कशी बघतेय ती माझ्याकडे!
खरं तर मला कबुतरं अज्जिबात आवडत नाहीत. मुख्य म्हणजे आमच्या सगळ्या building मध्ये जिथे तिथे colonies नी राहून सगळं घाण करुन ठेवलेनीत! पण आत्ता ना, एका कबुतरीने अंडं घातलंय माझ्या balconyतल्या एका कुंडीत! मला घाबरून सकाळी एकदा दूर जाऊन बसलेली, पण सतत डोळा माझ्याकडे! तेव्हा दिसलं, छोटुस्सं अंडं! आता तिला समजलंय कि तिला ती pregnant असल्याचा benefit मिळणारे. आम्ही तिला काही नाही करणार, आणि काही दिवस तिला इथेच मुक्काम ठेऊ देणार!
खरं तर मला हे बिलकूल पसंत नाहीये, पण नापसंत होऊन करतेय काय मी! असो.
आत्ता थोडासा पाय हलवला मी, तर लगेच माझ्या पुढच्या हालचालीकडे लक्ष हिचं! “उठतेय कि काय आता? येतेय कि काय इकडे? इजा तर नाही ना करणार ही माझ्या पिल्लाला?”
आई आई गं! मला आत्ता ही अग्गदी माझ्यासारखी वाटतेय! माझी पिल्लं वर्ष-सव्वा वर्षाची होईपर्यंत प्रत्येक दिसणारा माणूस, येणारा आवाज, कोणताही अन्न पदार्थ, वारा, पाऊस, खेळणं, काहीही, माझ्या बाळाला इजा तर करणार नाही ना? मग ही इजा अगदी physicalच होऊ शकेल असं नाही ना, त्यात मानसिक, बौद्धिक, भावनीक, आणी त्याही पलीकडे कित्तीतरी गोष्टी असतात! बघणारा माणूस, किंवा आसपासची वस्तू बऱ्यापैकी शुभ ईच्छेनेच तिथे प्रकट असते, पण आईची वक्र-संरक्षक (भोचक) दृष्टी काही हे मान्य किंवा सहन करू शकत नाही. तिचा protective mode कायमच On राहातो.

हाहाहा! आत्ताच पलीकडच्या एका मैदानावरून पोरांचा ओरडण्याचा आवाज आलेला, लगेच बाईसाहेब मान वर करून बघू लागल्या!
त्या वरून आठवलं, माझी पिल्लं ६ महिन्यांची असताना एका रात्री मी शेजारच्यांना, “गप्पांचा आवाज कमी करा” असं रात्री २ वाजता phone call करून सांगीतलं होतं! आज अजूनही भेटलं कि ते आम्हाला “आमचा आवाज आता येत नाही ना?” असं विचारतात, ही एक वेगळीच मजा! असो, त्यांना ही हे माहिती असेल, नाही तर कधी तरी कळेल, कि आई हि फक्त एक आईच असते.
त्यावेळेला ती तिच्या आयुष्यातले इतर roles सुद्धा पार पाडत असेल, पण तिचा पूर्ण प्राण हा तिच्या पिल्लांपाशीच घुटमळत असतो.. with protective mode always On!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..