वाटते आज पुण्यनगरी शेगावी जावं
माऊलीच्या चरणी मस्तक टेकवावं
आणि डोळे भरून ब्रम्हांडनायकानां पहावं
वाटते जावे आज तिर्थ क्षेत्र शेगावी
विजयग्रंथातील एक ओळ तरी वाचावी
प्रसादाची चून भाकर आनंदाने खावी
दीन दुबळ्यांची सेवा हीच खरी संपत्ती
ही शिकवण त्यांची सांगते महती
म्हणूनच तेथे कर माझे जुळती
देवघरात आहे तुमची प्रतिमा मोठी
साक्षात आहात तुम्ही चिंतामणी
दर्शनाची आस पुरवा याच क्षणी
सद्गुरू जाणता ना तुम्ही सगळं
अंगात नाही उरले नाही हो बळ
जाणा माझ्या अंतरीची तळमळ
हात जोडून प्रारथिते तुजला
आता तरी कर ना मुक्त मजला
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply