नवीन लेखन...

एक घास चिऊचा एक घास काऊचा

बाळ थोडे मोठे झाल्यावर आईबाबा त्याचे उष्टावळ करतात. पाच पक्वान्न. पाट. रांगोळी दिवा लावून त्याला न्हाऊ माखू घालून कपाळावर कुंकू लावून औक्षवण करून बाळ एवढे सगळे खाणार नाही पण त्याला पुढील आयुष्यात असेच मिळावे यासाठी दोघेही झटतात. मन मारून काटकसर करून. पहिला घास म्हणजे मवू गरगटा भात. तूप मीठ आणि वर दुधाची साय घालूनही आईचे समाधान होत नाही. त्यामुळे ती तो भात आणखीन बोटाने कालवून कालवून त्याला खाऊ घालते.

बाबा हे सगळे तृप्त मनाने पहात असतात. आता ते थोडे मोठे झाले की इकडून तिकडे पळत सुटले की हातात घास घेऊन एक घास चिऊचा.. एक.. घास असे म्हणत त्याच्या मागे मागे धावत जाऊन तेवढा भात संपवते. दमछाक होते. तर कधी घरातील सर्वांच्या नावाचा एकेक घास भरवताना म्हणते की हा घास आज्जीचा आजोबाचा नाही खाल्लात ते तुझ्याशी कट्टी करणार मग लाड कोण करणार म्हणून ते ही संपवले जाते…या मागचा उद्देश हा की त्याने पोटभर जेवण करावे.

शाळा सुटून घरी येईपर्यंत घास न घेणारी ती आई. गावाहून येईपर्यंत घास न घेता दारात बसून वाट पहात असतात ते बाबा
पहिल्या वाढदिवसाला केवढा थाट करून केक भरवतात. आई मुलाच्या मुंजीत भरवते पाच खिरी. मातृभोजनाला आईच्या घासाला फार महत्व आहे. आणि हा हक्क लग्नाच्या वेळी बायकोला दिला जातो. पुढची पिढी जन्माला आली की हेच चालू असते. आणि आईबाबा लांब खुर्चीवर बसून फक्त बघ्याची भूमिका पार पाडतात. मुलाच्या. आईच्या. बाबाच्या वाढदिवसाला. लग्नाच्या वाढदिवसाला. प्रेम दिन. महिला दिन. मातृदिन आणि कसले कसले दिन साजरे होतात तेव्हा हे दोघे सोडून ते बाहेर जेवायला जातात. घास खाऊ घालतात. तर कधी कधी घरीच मागवले जाते. पण ते वर्ज्य म्हणून. पचत नाही. आवडत नाही. त्यामुळे घरातील दोन पदार्थावर दोघांची भूक भागवली जाते. त्यावेळीही एकमेकांना घास भरवतात. आणि समोर बसलेल्या आईबाबांना बघत बसावे लागते. किंवा अगोदरच उरकून आपापल्या खोलीत जाऊन बसावे लागते.दीन असतात ना म्हणून.

तुकाराम महाराज म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान.. किती वास्तव सांगितले आहे ना. एरवी साधी चौकशी न करता मजेत जेवणारे पिंडदानच्या वेळी कावळ्याची वाट बघत बसतात. नाहीच आला कावळा तर दर्भाचा कावळा असतोच. चिऊ काऊचा घास खाऊन मोठी झालेली हे सगळे विसरून जातात. आणि शेवटी कावळा यायची वाट पहात असतात. तो आला काय न आला काय? काय फरक पडतो. मात्र काऊचा घास खाऊ घालतांना आईला जो आनंद समाधान होते ते या वेळी होत असेल का?

धन्यवाद.

— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..